डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालयतील कर्मचारी राधाबाई जवादवाड यांचा सत्कार

कंधार ; प्रतिनिधी

डॉ.बाबासाहेब आंबेडकर वाचनालय, नगरपरिषद कंधार येथील कर्तव्यदक्ष कर्मचारी श्रीमती राधाबाई माधवराव जवादवाड, हे आज दिनांक 30 जून 2022 रोजी सेवानिवृत्त झाल्या
. याबद्दल वाचनालय तफे श्रीमंती जवादवाड यांचा सत्कार समारंभ सोहळा संपन्न झाला

यावेळी सर्वप्रथम मोहम्मद रफीक सत्तार स. ग्रंथपाल, यांनी श्रीमती राधाबाई जवादवाड यांनी वाचनालयास दिलेल्या अविरत सेवेबद्दल माहिती देऊन त्यांचे आभार व्यक्त केले. त्यानंतर लता ढवळे यांच्या हस्ते राधाबाई यांचे साडी, पुष्पहार देऊन सन्मानित करण्यात आले.

कार्यक्रमास ग्रंथालय विभाग प्रमुख जितेंद्र ठेवरे, माजी स. ग्रंथपाल मोहम्मद गौस, खमरजमा खान, शेख नसीरुद्दीन, मिलिंद महाराज, संतोष कांबळे किशन भालेराव, नारायण जोंधळे, प्रकाश गुंडेकर, कर्मचारी उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *