हरित कंधार व सह्याद्री देवराई संयुक्त राबवणार पांगरा येथे वृक्ष लागवडीचा उपक्रम

कंधार ; दिगांबर वाघमारे.

हरित कंधार परिवार व सह्याद्री देवराई फाउंडेशन यांच्या यांच्या संयुक्त विद्यमानाने कंधार तालुक्यात वृक्ष लागवडीचा उपक्रम सिने अभिनेता तथा सह्याद्री देवराईचे सयाजी शिंदे यांनी हरित कंधार च्या माध्यमातून हाती घेतला

हरित कंधार परिवार गेल्या पाच वर्षापासून वृक्ष लागवड व निसर्ग संवर्धन यासाठी काम करते या कामाची दखल घेऊन निसर्ग संवर्धनामध्ये काम करणारे सह्याद्री देवराई फाउंडेशन चे प्रमुख सिने अभिनेता सयाजी शिंदे यांनी हरित कंधार करण्याचा संकल्प केला याकरिता हरित कंधार परिवाराने पुणे येथे सयाजी शिंदे यांची दि ९ जुलै रोजी सयाजी हॉटेल पुणे येथे भेट घेतली व हरित कंधार च्या उपक्रमाची माहिती त्यांना दिली.

हरित कंधार च्या कामाने प्रभावित होऊन सयाजी शिंदे यांनी हरित कंधार व सह्याद्री देवराई यांच्या संयुक्तपणे या नंतरचे सर्व उपक्रम राबवण्याची इच्छा त्यांनी व्यक्त केली यातूनच येणाऱ्या काळात कंधार तालुक्यात मोठ्या प्रमाणामध्ये वृक्ष लागवड व वृक्ष संवर्धन करण्याचे अभिवचन दिले यावेळी हरित कंधार परिवाराचे शिवा मांमडे, अड गंगाप्रसाद यन्नावार , अजय मोरे ,योगेंद्रसिंह ठाकूर ,दीपक गरुडकर व सह्याद्री देवराई चे समन्वयक सुशील घोटे यांची उपस्थिती होती

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *