हिमायतनगर -किनवट तालुक्यातील जलधारा येथील शासकीय आश्रम शाळेत शिक्षण घेत असलेल्या अकरा विद्यार्थ्यांना दि. २० जेवणातून विषबाधा झाली होती. या घटनेची गंभीर दखल घेऊन हिंगोली लोकसभा मतदारसंघाचे खासदार हेमंत पाटील यांनी शासकीय आश्रम शाळेला भेट देवुन मुख्याध्यापक शिक्षकांशी संवाद साधला.
दि. २० मंगळवारी जलधारा येथिल आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना जेवनातुन विषबाधा झाला होता, त्यामुळे हिमायतनगर ग्रामिण रूग्णालयात उपचार सुरू होते, गंभीर विद्यार्थ्यास नांदेडला हलविण्यात आले होते. या पार्श्वभुमीवर खासदार हेमंत पाटिल यांनी जलधारा आश्रम शाळेला भेट देलुन मुख्याध्यापक पाटील व अधीक्षक सूर्यवंशी यांना सोबत घेऊन मुलींचे वस्तीगृह, पाकशाळा व भांडार गृहाची पाहणी केली. शाळेत मोठ्या प्रमाणात भौतिक सुविधांचा अभाव असल्याचे खासदार हेमंत पाटील यांच्या लक्षात आल्यानंतर त्यांनी किनवट येथील प्रकल्प अधिकारी कीर्ती किरण पुजार यांच्याशी दूरध्वनी द्वारे संपर्क साधून त्या सुविधा पूर्ण करण्यासंदर्भात सूचना दिल्या.
यावेळी जलधरा येथील नवनिर्वाचित सरपंच वैशाली अनिल पाचपुते, ग्रामपंचायत सदस्य प्रकाश शिरडे, नमिता धनवे ,शामराव पाचपुते, सरस्वताबाई शिरडे यांनी खासदार पाटिल यांचे कडे गत 75 वर्षापासून रखडलेल्या मांजरी माथा येथील रस्त्या संदर्भात चर्चा केली. येथील रस्ता मंजूर करण्यासंदर्भात त्यांच्याकडे मागणीही केली असता. तात्काळ या रस्त्या संदर्भातचा प्रस्ताव माझ्याकडे पाठवा त्या प्रस्तावाला मान्यता देऊन प्राथमिक स्वरूपात मातोश्री पांदन रस्ता योजनेत याचा समावेश केला जाईल अशी त्यांनी ग्वाही दिली.
याप्रसंगी खासदार हेमंत पाटील यांच्यासोबत एकनाथ शिंदे गटाचे जिल्हाप्रमुख उमेश मुंडे, बालाजी मुरकुटे तालुकाप्रमुख ,सुरत सातुरवार शहर प्रमुख, माजी नगराध्यक्ष सुनील पाटील ,माजी उपसभापती गजानन कोल्हे, दिशा समिती सदस्य मारोती सुंकलवाड, भाऊराव राठोड ,सुदर्शन नाईक माहूर तालुका प्रमुख, मारोती दिवसे , पत्रकार परमेश्वर पेशवे , गौतम कांबळे ,व स्वीय सहायक सुनील गरड यांची प्रामुख्याने उपस्थिती होती.
खासदार हेमंत पाटिल यांना विद्यार्थ्यां बद्दल आदर स्नेहभाव नेहमीच राहिलेला आहे, ग्रामिण भागातील गरीब कुटुंबातील विद्यार्थ्यांच्या शिक्षणाप्रती सतत प्रत्नशिल असने हा त्यांच्या आवडीचा विषय, जलधारा शाळेतील विषबाधा प्रकरणाची माहिती मिळाल्यावर त्यांनी चिंता व्यक्त केली,
विषबाधा होवुन आजारी पडलेल्या विद्यार्थ्यांच्या भेटीसाठी शाळेवर पोहचले परंतु विद्यार्थ्यांची भेट होऊ शकली नाही, काही दिवस आरामासाठी त्यांच्या आई-वडिलांनी त्या विद्यार्थ्यांना गावाकडे नेले होते. विद्यार्थ्यांच्या सोयीसुविधा पुरवण्याच्या संबंधीतांना सुचना केल्या.