कंधार/प्रतिनिधी
ग्रामीण रुग्णालय कंधार येथे काल मंगळवारी सार्वजनिक आरोग्य विभागा अंतर्गत नवरात्र उत्सवा निमित्त महाराष्ट्रातील सर्व माता भगिनींसाठी माता सुरक्षित तर घर सुरक्षित या अभियान कार्यक्रमास प्रमुख पाहुणे म्हणुन शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ.आशाताई श्यामसुंदर शिंदे प्रमुख उपस्थित राहून तालुक्यातील माता भगिनींना शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सौ.आशाताई शामसुंदर शिंदे यांनी मार्गदर्शन केले, यावेळी आशाताई यांनी सर्व माता भगिनींचे कौटुंबिक महत्त्व व जबाबदारी आणि प्रत्येक कुटुंबातील महिला या कौटुंबिक दृष्ट्या सक्षम व निरोगी राहिल्यास सर्वच कुटुंब निरोगी व आनंदी राहील यासाठी सर्व कुटुंबियांनी योग्य ती खबरदारी घेऊन आपले कुटुंब आनंदी व निरोगी ठेवण्यासाठी प्रत्येक कुटुंबातील नागरिकांनी आपल्या कुटुंबातील माता भगिनींच्या उत्तम व सदृढ निरोगी आरोग्याची काळजी घेण्याची काळाची गरज असल्याचे आवाहन यावेळी सौ.आशाताई शिंदे यांनी केले, यावेळी या अभियानाचे उद्घाटन सौ.आशाताई शिंदे यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी आरोग्य विभागाच्या वतीने आशाताई यांचा यथोचित सत्कार करण्यात आला, याप्रसंगी वैद्यकीय अधिकारी डॉ. लोणीकर ,डॉ. पदमवार, कंधार कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती ज्ञानेश्वर पा. चोंडे, अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष शेख शेरु भाई,महेश पिनाटे, अवधूत पेटकर,वसंत मगनाळे, अशोक बोधगीरे सह आरोग्य विभागातील कर्मचारी,अधिकारी व पत्रकार बांधव उपस्थित होते.