ग्रामीण रुग्णालय कंधार येथे माता सुरक्षित तर घर सुरक्षित अभियानास सुरुवात ;वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांची माहिती

 

कंधार ; महाराष्ट्र शासन सार्वजनिक आरोग्य विभाग,नांदेड जिल्हा आरोग्य विभागाच्या वतीने जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. निळकंठ भोसीकर व ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.सूर्यकांत लोणीकर यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्र शासनाचे कार्यक्रम प्रभावीपणे राबिविण्यात अग्रेसर असलेले ग्रामीण रुग्णालयात आज दिनांक:-27/09/22 रोजी “माता सुरक्षित तर घर सुरक्षित “हे अभियान दिनांक 26 सप्टेंबर 2022 ते 05 आक्टोबर 2022 पर्यंत नवरात्रोत्सव करण्यात येत आहे.या शुभ मुहूर्तावर ग्रामीण रुग्णालय कंधार येथे सौ.आशाताई शिंदे (शे. का. प. च्या महिला प्रदेश अध्यक्ष ) यांच्या हस्ते मोहिमेचे फित कापून उदघाटन मोठ्या थाटामाटात करण्यात आले.

सौ.आशाताई शिंदे यांनी महिलांना असणाऱ्या आजार विषयी माहिती सांगण्यात आली व त्यांना शक्यतो फळे व पाले भाज्या नियमितपणे आहारात समावेश असावा त्यामुळे महिला स्ट्रॉंग राहतील असे मनोगत व्यक्त केले “माता सुरक्षित तर घर सुरक्षित”या अभियान विषयी माहितीचे वाचन व कार्यक्रमाचे प्रस्तावित डॉ. शाहीन बेगम (राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम महिला वैद्यकीय अधिकारी) यांनी केले व वैद्यकीय अधिक्षक डॉ. सूर्यकांत लोणीकर यांनी महिलांना आरोग्य बद्दल माहिती सांगुण मार्गदर्शन केले व सर्व जनतेनी या सुवर्ण संधीचा फायदा घ्यावा महिलांनी आरोग्य तपासण्या करून घेण्याचे असे आवाहन केले.

ग्रामीण रुग्णालय कंधार येथे महिलांची आरोग्य तपासणी करण्यात आली. तसेच सौ.चित्राताई गोरे (भाजपा जिल्हा महिला अध्यक्ष) यांनी महिलांच्या समस्या समक्षिकरण ऍनिमिया मुक्त भारत महिलांनी आपल्या नियमितपणे तपासण्या करून घाव्यात असे आपले मनोगत व्यक्त केले.

यावेळी प्रमुख उपस्थिती नरवाडे एस बी (कोषागार अधिकारी) ,सौ.अँड.मयुरी पदमवार,वर्षा कुलकर्णी (महिला अधीक्षक रामनाईक तांडा) तसेच रेखा गोरडवार पत्रकार , ज्ञानेश्वर चोंडे (कृषी उत्पन्न बाजार समिती सभापती), शेरूभाई( शेकाप अल्पसंख्यांक जिल्हाध्यक्ष )
अवधूत पेटकर, अँड कलीम अन्सारी यांचे स्वागत करण्यात आले. सौ सुषमा पागे गरोदर स्त्री व सौ.रेणुका देवकांबळे माता यांची नवजात बालिका यांचे स्वागत सौ.चित्ररेखा गोरे (भाजपा जिल्हा महिला अध्यक्ष) यांच्या हस्ते पुष्पगुच्छ स्वागत करण्यात आले.

सदरील अभियानात 18 वर्षावरील सर्व महिला गरोदर माता,यांची सर्व महिलांची वैद्यकीय आरोग्य तपासणी ( रक्तदाब स्क्रीनिंग, मधुमेह, स्क्रीनिंग,हिमोग्लोबिन स्क्रीनिंग,दंतचिकित्सा स्क्रीनिंग रक्तक्षय स्क्रीनिंग तसेच कर्करोग स्क्रीनिंग.30 वर्षावरील सर्व महिला व बालकांचे लसीकरण प्रतिबंधात्मक आणि उपचारात्मक आरोग्य सुविधा देण्यात येणार आहेत .सदरील कार्यक्रमा चे अभियान राबवित असल्याबाबत श्रीमती. आशाताई शिंदे व चित्राताई गोरे उपस्थितानी डॉ.सूर्यकांत लोणीकर व ग्रामीण रुग्णालयामधील अधिकारी व कर्मचारी यांचे कौतुक केले.

यावेळी ग्रामीण रुग्णालयाचे वैद्यकीय अधिकारी डॉ.महेश पोकले या रुग्णालयाचे सक्षम कार्यवाहक डॉ.राजू टोम्पे (स्त्री रोग तद्द) डॉ. पोरे रविकिर, डॉ. संतोष पदमवार(दंतशल्य चिकित्सक) ,
डॉ. नम्रता ढोणे (रा बा स्वा का महिला वैद्यकीय अधिकारी),डॉ. प्राजक्ता बंडेवार,डॉ. निखहत फातेमा (आयुष्य वैद्यकीय अधिकारी) ,डॉ. मोरे एस. एस.
डॉ. अरुनकुमार राठोड, डॉ. गजानन पवार (रा बा स्वा का वैद्यकीय अधिकारी) या कार्यक्रमाचे
सूत्रसंचलन डॉ. डी. एल.गुडमेवार तर आभार प्रदर्शन डॉ. संतोष पदमवार यांनी केले.यावेळी ग्रामीण रुग्णालय कंधार येथे पत्रकार बांधव आणि ग्रामीण रुग्णालयातील सर्व वैद्यकीय अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *