कंधार ; पक्षप्रमुख उध्दवजी बाळासाहेब ठाकरे यांच्या आदेशानुसार जिल्हासंपर्कप्रमुख बबनराव थोरात यांच्या मार्गदर्शनाखाली जिल्हाप्रमुख दता कोकाटे,उपजिल्हाप्रमुख बाळासाहेब कऱ्हाळे यांच्या नेतृत्वाखाली घटस्थापने दिनाचे औचित्य साधून दिनांक २६ संप्टेबर रोजी कंधार तहसिल कार्यालया समोर सदस्य नोंदणीस सुरवात केली अशी माहिती जेष्ठ शिवसैनिक गणेश कुटेवार यांनी दिली .
शिवसेनाप्रमुख हिन्दुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या प्रतिमेला पुष्पहार घालुन सदस्य नोंदणीस सुरवात केली.सदस्य नोंदणीसाठी उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला.दिवसभरात ११०५ शिवसैनिकांनी सदस्य नोंदणी केली.विशेष म्हणजे जी नोंदणी केली त्यांनी उध्दवजीच्या कार्याचे कौतुक केले अन त्यांच्या पाठीशी उभे राहण्याचा दृढ विश्वास बोलून दाखविला. यावेळी तालुकाप्रमुख परमेश्वर पाटील जाधव,लोहा तालुकाप्रमुख सुरेश पाटील हिलाल, जेष्ठ शिवसैनिक गणेश कुटेवार , शहरप्रमुख बाळू पाटील लुंगारे,सभापती प्रतिनिधी पंडीत देवकांबळे, पंचायत समिती सदस्य उतम चव्हाण,अतुल पापीनवार,पांडुरंग पाटील लुंगारे, पप्पू लुंगारे, दिपक लुंगारे, अजिंक्य यन्नावार, संजय लुंगारे, जिजम पवळे, पवन घाटे यांच्या सह अनेक शिवसैनिकांनी उपस्थिती होती.