कौठा येथे अखंड दत्तनाम सप्ताह व दत्तजयंती सोहळ्यास प्रारंभ

 कौठा ; (  प्रभाकर पांडे )

 

 

ता.कंधार येथे दरवर्षी प्रमाणे यावर्षी ही आनंद सांप्रदाय दत्त संस्थान कौठा यांच्या भक्ती सौजन्याने व श्री सदगुरू १०८ स्वामी गंभीरबन महंत महाराज दत्त संस्थान कोलंबी यांच्या कृपेने व गुरुभक्त अमरपदवासी गोविंदराव संभाजी देशमुख यांच्या ज्वलंत गुरुभक्ती प्रेरणेने अखंड दत्तनाम सप्ताह व दत्त जयंती सोहळ्यास सुरुवात झाली या सोहळ्यातील दैनदीन कार्यक्रम पूढील प्रमाणे आहेत.

सकाळी बाळक्रिडा ग्रंथाचे पारायण दुपारी महापूजा व रात्री किर्तन पूढील प्रमाणे दि.1/12/2022 रोज गुरुवार द.भ.प. साहेबराव पाटील गोळेगावकर दि.2/12/2022 रोज शुक्रवार द.भ.प. पांडूरंग गादगे किवळेकर दि.3/12/2022 रोज शनिवार द.भ.प. प्रताप पाटील पिंपळकौठेकर 4/12/2022 रोज रविवार द.भ.प. कोडींबा पाटील चिखलीकर 5/12/2022 रोज सोमवार द.भ.प. मारोती पाटील शंकरगावकर 6/12/2022 रोज मंगळवार नागोराव पाटील आलेगावकर 7/12/2022 रोज बुधवार सकाळी महाप्रसाद द.भ.प. बालाजीराव देशमुख गुरुजी कौठेकर यांचे दत्तजयंती पर किर्तन व नंतर लगेचच महाप्रसादाचे आयोजन करण्यात आल्याचे आयोजक बसवंत गोविंदराव देशमुख व आनंद दत्त सांप्रदाय कौठा यांनी सांगीतले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *