नामविस्तारमुळे विद्यापीठाचा गौरव वाढला. डॉ पी डी मामडगे

धर्मापुरी ( प्रतिनिधी ) पुर्वाश्रमीच्या मराठवाडा विद्यापीठाच्या नामविस्तारामुळे विद्यापीठाचा गौरव वाढला आहे. असे गौरवपर उदगार डॉ पी डी मामडगे यांनी काढले.

ते येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयात रासेयो विभागा तर्फे आयोजित नामविस्तार दिनाच्या कार्यक्रमात प्रमुख वक्ते म्हणून बोलत होते.कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ टी एल होळंबे होते.

पुढे बोलताना डॉ मामडगे म्हणाले की विद्यापीठाला मोठा इतिहास आहे. उच्च शिक्षणामुळे माणूस ‘ माणूस ‘ होतो. त्या विद्यापीठाचा आपण सर्व जण एक भाग आहोत. याचा आपणास सार्थ अभिमान आहे. ज्ञानाचा महासागर डॉ बाबासाहेब आंबेडकर यांचे नाव विद्यापीठाला दिले गेले. त्यामुळे निश्चितच विद्यापीठाचा गौरव वाढला आहे.कार्यक्रमाच्या सुरुवातीला डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *