उदगीर ते नांदेड राष्ट्रीय महामार्गवरून गाड्याची वरदळ वढली आहे या मार्गांवर बस नसल्याने नगरिकांना त्रास होत आहे. कंधार ते नांदेड परिवहन मंडळाची बस बहादरपुरा, कोटबाजार, मानसपुरी, लालवाडी मार्गी सुरु करा अशी मागणी निवेदनाद्वारे एमपीजे सामाजिक संघटनेच्या वतीने नांदेड चे खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे केली.
तालुक्यातून सध्या कंधार ते नांदेड जाणारी बस ही लोहा मार्ग जात आहेत. त्यामुळे बहादरपुरा, कोटबाजार, नवरंगपुरा, मानसपुरी या गावातील व आजुबाजुच्या बरेच खेडेगाव असल्यामुळे त्यांना नांदेडला जाण्यासाठी कंधार ला यावे लागते त्यामुळे त्यांना नांदेडला जाण्यासाठीचा अंतर हा जास्त होत आहे त्यामुळे फार मोठया प्रमाणात त्रास होत आहे. जर बहादरपुरा, कोटबाजार, मानसपुरी, लालवाडी मार्ग नांदेड ला एस.टी. बस सेवा सुरु केल्यास या मार्गावरील लोकांचे व खेडयापाडयातील लोकांचे नांदेडला जाण्यासाठीचे अंतर खुप कमी होईल व खर्च पण कमी लागेल. तसेच एस. टी. महामंडळाला पण आर्थीक फायदा सुध्दा होईल.
कंधार-नांदेड मार्ग बहादरपुरा, कोटबाजार, मानसपुरी, लालवाडी या मार्गाने तीन टाईम (येणे-जाणे) एस.टी. बस सुरु करण्याची कृपा करावी अशी मागणी मोमेन्ट फॉर पीस अँड जस्टीस वेलफेर सामाजिक संघटनेच्या वतीने खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्याकडे एमपीजे सामाजिक संघटनेचे तालुका (अध्यक्ष) मिर्झा जमील बेग, अझर सरवरी (उपाध्यक्ष), सुलतान खान (सचिव), शेख इमरोज (सह. सचिव), मोहम्मद रियाज (कोष अध्यक्ष), यांची सवक्षरी व मोहम्मद अजिमोद्दीन निजामोद्दीन (सरपंच), शेख पाशा (उप सरपंच प्र…) ऍड खादर बेग, मोहम्मद तन्वीररोद्दीन , सफीउल्ला बेग, अफसर खान, बालप्रसाद मानसपुरे, किरण कोकाटे, हिदायात बेग, निहाल अहेमद मन्सूरी, शेख याखुब जीवन, अब्दुल बारी, मोहम्मद निसार, मोहसीन खान, अथर साई, यांचे सुद्धा स्वाक्षरी असून उपस्थित होते.