महात्मा फुले हायस्कूल नाईकनगर शाळेत शिवजयंती उत्सव साजरा

 

नांदेड – महत्मा फुले हायस्कूल नाईकनगर नांदेड येथे दिनांक १९ फेब्रुवारी  रोजी शाळेच्या वतीने हिंदवी स्वराज्याचे संस्थापक, कुशल युद्धनीतीचे जागतिक प्रणेते, कुळवाडीभूषण पूजनीय राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त महाराजांना पुष्पांजली अर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

याप्रसंगी शाळेच्या वतीने  मुख्याध्यापक  भारत माधवराव कलवले  तसेच शालेय शिक्षण समितीचे अध्यक्ष अमोलभाऊ केंद्रे  यांचे वतीने राजे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या प्रतिमेस पुष्पमाला व पुष्पअर्पण करून अभिवादन करण्यात आले.

 

 

याप्रसंगी एम.एन.गुंटूरकर , माननीय एन.पी.केंद्रे व माननीय एस.पी.डांगे , ए.व्ही.रामगिरवार , आदर्श शिक्षक आशीर्वाद गाडे, एच.आर.चव्हाण, नितीन रानशेवार, चंद्रमणी सोनकांबळे शाळेतील विद्यार्थ्यी,सहशिक्षक व कर्मचारी मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *