धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे ) येथील कै शं गु ग्रामीण कला, वाणिज्य आणि विज्ञान महाविद्यालयाच्या रासेयोचे विशेष निवासी शिबीर आज दि ०२ मार्च ते ०८ मार्च २३ दरम्यान गुट्टेवाडी ता परळी वै येथे संपन्न होणार आहे.
हे विशेष युवक युवती शिबीर सन २०२२ – २३ ‘युवकांचा ध्यास ग्रामीण विकास ‘ या विषयावर होणार आहे. सकाळी ११ : ०० वाजता संपन्न होणाऱ्या उद्घाटनप्रसंगी अध्यक्षस्थानी जय भगवान सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ शिवाजीराव गुट्टे ( अण्णा ) असणार आहेत. प्राचार्य डॉ टी एल होळंबे यांच्या हस्ते उद्घाटन करण्यात येणार आहे. यावेळी रासेयोचे जिल्हा समन्वयक डॉ अमोल गंगणे आणि प्रा मकरंद जोगदंड यांचे मार्गदर्शन लाभणार आहे. सरपंच बालासाहेब देविदास गुट्टे,ग्रामस्थ एकनाथ ग्या गुट्टे आणि मुख्याध्यापक माधव मा वारले यांची विशेष उपस्थिती या कार्यक्रमास राहणार आहे. या विशेष रासेयो शिबीरात मोठ्या संख्येने सहभागी होण्याचे आवाहन रासेयो कार्यक्रम अधिकारी प्रा जी आर मुंडे,प्रा व्ही आर डावरे आणि डॉ सौ ए डी चाळक यांनी केले आहे.