लोहा/ प्रतिनिधी
लोहा कंधार मतदार संघाचे लोकप्रिय, कर्तव्यदक्ष आमदार श्यामसुंदर शिंदे, शेतकरी कामगार पक्षाच्या महाराष्ट्र महिला प्रदेशाध्यक्षा तथा सामाजिक कार्यकर्त्या सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे, शेतकरी कामगार पक्षाचे मराठवाडा विभागीय सहचिटणीस तथा युवा नेते विक्रांत दादा श्यामसुंदर शिंदे यांच्या हस्ते आमदार शिंदे यांच्या नांदेड येथील निवासस्थानी सामाजिक कार्यकर्ते सतीश पाटील बाबर आष्टूरकर यांची शेतकरी कामगार पक्षाच्या युवा नांदेड जिल्हाध्यक्षपदी निवड करण्यात आली आहे.
सदरील निवडीचे पत्र आमदार श्यामसुंदर शिंदे ,महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई शिंदे, विभागीय सहचिटणीस तथा युवा नेते विक्रांत दादा शिंदे यांच्या हस्ते सतीश पाटील बाबर आष्टूरकर यांना देण्यात आले, यावेळी नवनिर्वाचित युवा जिल्हाध्यक्ष सतीश पाटील बाबर यांचे आमदार शामसुंदर शिंदे यांनी अभिनंदन करून भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या, यावेळी माजी जि. प. सदस्य चंद्रसेन पाटील गौडगावकर, आझाद ग्रुपचे अध्यक्ष भीमाशंकर मामा कापसे, राजू पाटील कापसीकर, माजी सरपंच गोविंदराव पाटील चिंचोलीकर, धनाजीराव पाटील ढगे, श्याम पा.कपाळे, सचिन पाटील कुदळकर, प्रशांत मोरे यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. यावेळी नवनिर्वाचित युवा जिल्हाध्यक्ष सतीश पाटील बाबर मित्र मंडळातील असंख्य कार्यकर्त्यांनी आमदार शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शेतकरी कामगार पक्षामध्ये जाहीर प्रवेश केला .