लोहा येथे भरपावसात वड व करंजी , पिंपळ वृक्षांचे लागवड

 

लोहा ; ( प्रतिनिधी अंतेश्वर कागणे )

शिक्षक सेनेचा उपक्रम शिवसेनेचे पक्षप्रमुख तथा महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री मा.उद्धवजी ठाकरे साहेब यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं शिक्षक सेनेचे राज्याध्यक्ष ज.मो.अभ्यंकर साहेब यांच्या संकल्पनेतुन दि .27/07/2023 जि.प.प्रा.शाळा किवळा केंद्र सोनखेड ता.लोहा येथे भरपावसात वड व करंजी , पिंपळ वृक्षांचे लागवड करण्यात आली .यावेळी शिक्षकसेनेचे जिल्हाध्यक्ष संतोष अंबुलगेकर , जिल्हासरचिटणीस रवि बंडेवार शा.व्य.समितीचे अध्यक्ष श्री चक्रधर पाटील शाळेचे मुअ पी.डी.शिंदे सर , बोरकर सर , अविनाश अवधुतवार सर , कुसुमकर , मठपती सर , यलमवाड सर , अंबेकर मॕडम , बच्चेवार मॕडम , राठोड मॕडम , पवार मॕडम , बालाजी जाधव व विद्यार्थी उपस्थित होते. यावेळी झाडांचे महत्व विद्यार्थ्यांना सांगण्यात आले. वृक्षारोपन कार्यास सहकार्य केल्याबद्दल सर्व बांधवाचे संतोष अंबुलगेकर सर यांनी आभार मानले .

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *