कंधार ; प्रतिनिधी
अवैध्य शस्त्र बाळगणारे व्यक्तीची माहीती काढुन त्यांचेविरूध्द कायदेशीर कारवाई करण्याच्या सुचना मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक नांदेड, व मा. अबिनाश कुमार अपर पोलीस अधिक्षक साहेब नांदेड यांनी सर्वांना दिल्या होत्या त्यावरून मा. मारोती थोरात उपविभागीय पोलीस अधिकारी कंधार व मा. सुभाषचंद्र मारकड पोलीस निरीक्षक कंधार यांनी कंधार पोलीस स्टेशन हददीत गोपनिय माहीती काढुन अवैध्य शस्त्र बाळगणारे व्यक्तीवर कारवाई करण्याचे आदेश दिल्याली होती त्यावरून दि. ०४/०८/२०२३ रोजी गोपनिय बातमीदारा मार्फत खात्रीशीर बातमी मिळाली की, कंधार शहरात एका मुलाकडे तलवार असुन ती त्याने त्याचे घरी ठेवली आहे असे गोपनिय खात्रीशीर बातमी मिळाली. त्यावरून सदर व्यक्तीचे घरी जावुन त्याची घरझडती घेतली असता त्याचे घरझडतीमध्ये एक तलवार मिळाली त्यावरून त्याचे विरूध्द कंधार पोलीस ठाणे येथे गु.र.नं. २३२/२०२३ कलम ४, २५ भारतीय हत्यार कायदा प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सदरची कामगीरी मा. श्रीकृष्ण कोकाटे पोलीस अधिक्षक नांदेड, मा. अबिनाश कुमार अपर पोलीस अधिक्षक साहेब नांदेड, मा. मारोती थोरात उपविभागीय, मा. सुभाषचंद्र मारकड पोलीस निरीक्षक कंधार यांचे मार्गदर्शनाखाली अदित्य लोणीकर सहा. पोलीस निरीक्षक, गोपाल इंद्राळे पोलीस उपनिरीक्षक, सहा. फौजदार गणाचार्य, पोहेकॉ २०२० गिरे, पो.हे.कॉ. २०५९ सानप, पो. कॉ. ८२० वानरे, पो. कॉ. १७३९ केंद्रे, पो. कॉ. ३१६६ पारदे यांनी पार पाडली आहे.