लक्ष्मण वाठोरे यांचे वृद्धापकाळाने निधन : आज अंत्यविधी

नांदेड सांगवी बू. शिवनेरी नगर येथील ज्येष्ठ नागरिक, सेवा निवृत्त कृषी अधिकारी लक्ष्मण गोदाजी वाठोरे यांचे शनिवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता वृद्धापकाळाने निधन झाले. मृत्यू समय ते 88 वर्षांचे होते.
कृषी विभागात कृषी अधिकारी म्हणून प्रदीर्घ सेवा केल्यानंतर ते सेवानिवृत्त झाले होते.सेवा निवृत्तीनंतरही सामाजिक कार्यामध्ये सातत्याने पुढाकार घेणारे लक्ष्मण वाठोरे यांची गेल्या काही दिवसापासून प्रकृती ठीक नव्हती. त्यातच शनिवार दिनांक ५ ऑगस्ट रोजी दुपारी एक वाजता त्यांची प्राणज्योत मालवली. त्यांच्या पार्थिवावर उद्या रविवार दिनांक 6 ऑगस्ट रोजी सकाळी अकरा वाजता सांगवी बु. येथील स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या पश्चात एक मुलगी, जावई, नातवंड असा परिवार आहे. इंजिनीयर संघरत्न सावंत यांचे ते सासरे होत.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *