प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसातून मतदार संघात शक्ती प्रदर्शनाने कार्यकर्त्यात जल्लोश 

 

कंधार ; प्रतिनिधी

लोहा कंधार विधानसभेचे प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त ४ आगस्ट रोजी कंधार शहरांमध्ये अभुतपूर्व स्वागत करण्यात आले, जागोजागी सत्कार पुष्पवृष्टी व ढोल ताशाच्या गजरामध्ये प्रचंड जनसमुदायाच्या उपस्थितीमध्ये वाढदिवस साजरा करण्यात आला.
भारतीय जनता पार्टीचे जिल्हा सरचिटणीस तथा लोहा कंधार विधानसभा प्रमुख प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त नगरेश्वर मंदिर कंधार येथे प्रबोधनकार, प्रख्यात व्याख्याते ह भ प संग्राम बापू महाराज भंडारे यांच्या कीर्तनाचे आयोजन करण्यात आले होते तसेच प्रवीण पाटील चिखलीकर यांच्या वाढदिवसानिमित्त कंधार शहरातील मुख्य रस्त्यावर जागोजागी बॅनर, मंडप, भव्यअशी पुष्पवृष्टी करण्याचे नियोजन कार्यकर्त्यांच्या वतीने केले गेले होते विशेषतः शुभेच्छा बॅनरवर ‘भावी आमदार’ असा उल्लेख कार्यकर्त्यांनी केला व त्याच अनुषंगाने मोठ्या प्रमाणावर शक्तिप्रदर्शन कार्यकर्त्यांनी केले.
कंधार शहरातील प्रवेशावेळी मराठा हॉटेल, बस स्थानक ,महाराणा प्रताप चौक ,अण्णाभाऊ साठे पुतळा ,डॉ बाबासाहेब आंबेडकर पुतळा ,बडी दर्गा,नावरंगपुरा व छत्रपती शिवाजी महाराज चौक या ठिकाणी कार्यकर्त्यांच्या वतीने मंडप टाकून प्रवीण पाटील चिखलीकर यांचा वाढदिवस साजरा केला छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे प्रवीण पाटील चिखलीकर यांच्यावर जेसीबीच्या साह्याने पुष्पवृष्टी करण्यात आली या पुष्पवृष्टीने कंधारवाशी यांचे लक्ष वेधून घेतले .
किर्तन सोहळ्याच्या समारोपप्रसंगी प्रवीण पाटील चिखलीकर यांनीअभरपर मनोगत म्हणाले की कंधार लोहा विधानसभेतील जनता ही एका विश्वासाने चिखलीकर कुटुंबाशी एकरूप झालेली आहे कोणी कितीही विघ्न आणण्याचा प्रयत्न केला तरी ही जनता चिखलीकर कुटुंबासोबत सदैव राहील या जनतेच्या ऋणातून चिखलीकर कुटुंबीय कधीही मुक्त होणार नाही असेच प्रेम चिखलीकर कुटुंबीयांच्या वतीने कंधार लोहा विधानसभेतील जनतेवर राहील असे ते म्हणाले यावेळी प्रतिभाताई प्रतापराव चिखलीकर, प्रदेश कार्यकारणी सदस्या प्रणिताताई देवरे चिखलीकर, प्रदेश कार्यकारणी सदस्य बाबुराव केंद्रे, महिला मोर्चाच्या जिल्हाध्यक्ष चित्राताई गोरे ,तालुका अध्यक्ष भगवान राठोड, सरचिटणीस किशनराव डफडे ,शहराध्यक्ष अड गंगाप्रसाद यन्नावार, सचिनपाटील चिखलीकर ,संदीपपाटील चिखलीकर ,युवा मोर्चाचे जिल्हा उपाध्यक्ष निलेश गौर, शहर सरचिटणीस मधुकर डांगे, सरचिटणीस कैलास नवघरे, चेतन केंद्रे ,प्रकाश तोटावाड ,सुनील कांबळे, आसिफ शेख, पिंटू कदम, अनिता कदम, हनुमंत डुमणे, व्यंकट मामडे, साईनाथ कोळीगीरे, बालाजी झुंबाड, प्रदीप मंगनाळे ,राजहंस शाहपुरे, कैलास कांबळे, गोविंद पवार बालाजी पवार,अड सागर डोंगरजकर, प्रवीण बनसोडे, शुभम संगणवार ,रामदास बाबळे ,अमरदीप येवतीकर, शैलेश बोरलेपवार ,श्रीराम जाधव, शंतनु कैलास, महिला मोर्चाच्या तालुकाध्यक्ष डॉ जयमंगला औरादकर ,माजी नगरसेविका वंदनाताई डुमणे, कल्पनाताई गीते, प्रकाश घोरबांड ,व्यंकट नागलवाड, राजू लाडेकर ,समीर चौउस,सय्यद अमजद,महंमद जाफर,सतीश कांबळे,बाळू धुतमल, गंगाधर कांबळे, विकास कांबळे,शेख मनु,शेख मझर, शेख सुलतान, रमेश पवार,अभिजित इंदूरकर,कृष्णा टोकलवाड,अनिल श्रीमंगले, यांच्या सह भाजप चे पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *