मुखेड ; प्रतिनिधी
मुखेड ; गेली दहा वर्षापासून अखंडित सुरु असलेल्या मन्याड-गोदावरी खोऱ्यातील सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार व राष्ट्रप्रेमी कंधारकर यांचे वतीने ३३३३ सदिच्छापत्र,३३३३ राख्या सोबत १५ फुटाची महाराखी पाठविण्याच्या अखंडीत चालत असलेल्या उपक्रमास प्रेरणास्त्रोत डाॅ.भाई केशवरावजी धोंडगे यांची उर्जेवर हा उपक्रम चालतो.यंदा मुखेड ( मोहनावती ) नगरीतील महात्मा ज्योतिराव फुले महाविद्यालयातील भगीनींनी सहभाग नोंदविला.
या देशभक्तीच्या स्फूर्तिदायक उपक्रमास महाविद्यालयाचे आदर्श प्राचार्य डाॅ.एस.बी.अडकिणे यांच्या पुढाकाराने महाविद्यालयात यशस्वी राबविला.या कार्यक्रमा प्रसंगी प्राचार्य डाॅ.अडकिणे सरांनी मनोगत व्यक्त करतांना म्हणाले.
आपल्या देशाच्या सीमेवर तैनात भारतीय सैनिकांना रक्षाबंधन सणा निमित्त राख्या व सदिच्छापत्र पाठविण्याच्या उपक्रमात आमच्या महाविद्यालयातील भगीनींना मिळते आहे.
स्वतः विद्यार्थीनीनी आपल्या हस्तकलेने राखी तयार करुन आपल्या सैनिक बांधवांना पाठवित आहेत.ही बाब महाविद्यालयाच्या दृष्टीने भुषणावह आहे.याचा मला प्राचार्य म्हणून सार्थ अभिमान आहे.या कार्यक्रमात मराठी विभाग प्रमुख अधिव्याख्याता सी.बी.साखरे सर,उपप्राचार्य अधिव्याख्याता एस.बी.बळवंते,दैनिक श्रमिक लोकराज्याचे संपादक ज्ञानेश्वर डोईजड सर, अधिव्याख्याता डाॅ. पी.डी.राठोड सर या कार्यक्रमाचे आयोजन राष्ट्रीय सेवा योजना अधिकारी तथा क्षेत्रीय समन्वयक अधिव्याख्याता डाॅ.सी.एन.एकलारे सर सहकार्यक्राधिकारी अधिव्याख्याता डाॅ.बी.एस.केंद्रे सर यांनी केले.
या कार्यक्रमास कार्यालयीन वरिष्ठ व कनिष्ठ लिपीक सहीत नाॅनटिचींग स्टाफ उपस्थित होता.सदरील कार्यक्रमाचे वृतांकण दैनिक श्रमिक लोकराज्याचे लेखनी बहाद्दर पत्रकार मित्र संदीप पिटलेवाड यांनी लिहिले आहे. हा कार्यक्रम म.ज्योतिराव फुले महाविद्यालय मुखेडच्या महाविद्यालयात राबविल्याबद्दल गोपाळसुत दत्तात्रय एमेकर गुरुजी,रा.क्रांतिभुवन बहाद्दरपूरा व सुंदर अक्षर कार्यशाळा कंधार यांचे वतीने शतशः आभार!जयक्रांती!, जय महाराष्ट्र! जयहिंद!वंदे मातरम् !भारत माता की जय!