काय झालं असेल तिला ??( पाल )
काय झालं असेल त्याला ( माणुस )
आता एक फेसबुकवर कोणीतरी पोस्ट केली , माझ्या घरात भिंतीवरुन पाल मरुन पडलेय काय झालं असेल तिला ??
एक तर ती जनरल पोस्ट असेल किवा त्या व्यक्तीला प्राणी पक्षी बद्द्ल प्रेम असेल पण त्यावर लोकांनी इतक्या काही विचित्र कमेंट केल्या आहेत की ते पाहुन एक तर तिला मेल्याहुन मेलं झालं असेल किवा मी का मेले ?? असा प्रश्न पडला असेल.. मढ्यावरचं लोणी खाणारे लोक पाहिले की वाटतं एखाद्याला सुखासुखी जगु देत नाहीतच पण मरुही देत नाही.. कुछ तो लोग कहेंगे म्हणुन समोरच्याने आत्महत्या करावी इतकही वाईट आपण त्याच्याशी वागु नये. अनेक आत्महत्याची प्रकरणं समोर येतात त्यामध्ये सुध्दा अनेक मंडळी मानसिक त्रास देतात किवा स्वतः पुढे जायचे आहे म्हणुन दुसऱ्याला मागे खेचतात , कोणी कोणाचे पैसे बुडवतो..
माझ्या वाचकांना सांगावं वाटतं , असल्या कुठल्याही गोष्टी आपल्या हातुन घडत असतील तर त्वरीत थांबवा आणि हरीनाम घ्या.. दुसऱ्याला त्रास देउन आपण सुखी होत नाही तर तेच उलटुन आपल्याकडे येतं.. नको तिथे व्यक्त होवु नका..
मधे माझ्या माहीतीत एक किस्सा घडला होता , एका मुलीला काळी काळी हिणवुन शेवटी तिने स्वतःला संपवलं.. ज्यानी कोणी हे कृत्य केलं त्याची सुटका आहे का ??.. जाडीवरुन अनेकदा ट्रोल केलं जातं… कधी आर्थिक परिस्थितीवरुन कमी लेखलं जातं.. प्लीज असं काहीही करु नका.. खुप छोट्या आयुष्यात आपल्याला खुप चांगलं काम करायचं आहे आणि अध्यात्माची जोड असेल तर आपण आतुन शांत रहातो.. कोणाचं काहीही मनाला लावुन न घेता काम करत रहाण्याची ताकद अध्यात्माने मिळते..
माझा वाचकवर्ग याचा जरूर विचार करेल याची खात्री आहे..
हरे कृष्ण.. हरे कृष्ण..
कृष्ण कृष्ण .. हरे हरे
हरे राम .. हरे राम
ऱाम राम हरे हरे..
सोनल गोडबोले