डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार येथे ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस. आर. रंगनाथन यांची 131 वी जयंती

कंधार ; डॉ बाबासाहेब आंबेडकर वाचनालय नगरपरिषद कंधार येथे दि १२/०८/२०२३ रोजी ग्रंथालय शास्त्राचे जनक डॉ एस. आर. रंगनाथन यांची 131 वी जयंती निमित्त ग्रंथालयाचे सभासद प्रा. विश्वंभर बन सर व श्रीमंगले माधव यांच्याकडून ग्रंथालयास देणगी स्वरूपात मिळालेल्या ग्रंथ प्रदर्शनाचे आयोजन करून जयंती साजरी करण्यात आली.

 

यावेळी सर्वप्रथम मोहम्मद रफीक सत्तार स. ग्रंथपाल यांनी डॉ. एस. आर. रंगनाथन यांच्या जीवन कार्यावर माहिती दिली. तसेच ग्रंथालयाचे रेग्युलर वाचक श्री फुले काशिनाथ ईरबाजी, यांच्या हस्ते डॉ एस. आर. रंगनाथन यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करण्यात आले. यावेळी मोठ्या संख्येने वाचक उपस्थित होते. ग्रंथालय कर्मचारी दत्ता ऐनवाड, मिलिंद महाराज, श्रीमती कमलबाई जाधव, उपस्थित होते.

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *