जात पडताळणी कार्यालयात, सद्भावना दिवस प्रतिज्ञा.

नांदेड ; प्रतिनिधी

जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती, नांदेड येथे शुक्रवार, दिनांक १८ ऑगस्ट, २०२३ रोजी. स्व. राजीव गांधी यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून कार्यालयात जयंती साजरी करण्यात आली.

 

यावेळी, सद्भावना दिवस प्रतिज्ञा “मी अशी प्रतिज्ञा करतो की, मी जात, वंश, धर्म, प्रदेश किंवा भाषा विषयक भेद न करता, सर्व भारतीय जनतेचे भावनिक ऐक्य आणि सामंजस्य यासाठी काम करीन. मी आणखी अशी प्रतिज्ञा करतो की, आमच्यामधील सर्व प्रकारचे मतभेद मी हिंसाचाराचा अवलंब न करता विचार विनिमय करुन व संविधानिक मार्गाने सोडवीन.” अशी प्रतिज्ञा सोनू दरेगावकर यांनी वाचन केली.

 

 

यावेळी, मुकुंद मुळे, सिद्राम रणभिरकर, विठ्ठल आडे, साजिद हासमी, वैजनाथ मुंडे, मनोज वाघमारे, ओमशिवा चिंचोलकर, सुनील पतंगे यांची उपस्थिती होती..!

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *