राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर कार्यकारिणीचे विस्तारीकरण

 

भोकर ; प्रतिनिधी

राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर कार्यकारिणीचे विस्तारीकरण करण्यात आली.
या विस्तारीकरणात भोकर येथील कापड असोशिएशन चे अध्यक्ष तथा प्रसिद्ध उद्योजक,डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे विद्यमान संचालक व पत्रकार सारंग मुदडा,सामाजिक कार्यकर्ते तथा जेष्ठ पत्रकार राजेश चंद्रे,प्रिंटिंग उद्योजक तथा पत्रकार रमाकांत जोशी,प्रिंटिंग उद्योजक तथा पत्रकार विनय दुर्केवार या ४ नुतन पत्रकार बांधवांचा समावेश करण्यात आला असून सहसचिव, सहसंघट,सल्लागार व सदस्यपदी उपरोक्त बांधवांची सर्वानुमते निवड करण्यात आली.

या औचित्याने डॉ.शंकरराव चव्हाण कृषि उत्पन्न बाजार समिती भोकर चे सभापती जगदीश पाटील भोसीकर, उपसभापती बालाजीराव श्यानमवाड यांनी उपरोक्त पत्रकार बांधवांचा यथोचित सत्कार करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या.तर बाजार समितीच्या सचिव पदी प्रदिप पाटील सुर्यवंशी यांची नुकतीच नियुक्ती करण्यात आली.या औचित्याने राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघाच्या वतीने मराठवाडा महासचिव संपादक उत्तम बाबळे,तालुकाध्यक्ष बालाजी नार्लेवाड, पदाधिकारी प्रा.आर.के. कदम,विजयकुमार चिंतावार, कमलाकर बरकमकर,बालाजी कदम पाटील,विठ्ठल सुरलेकर, गजानन गाडेकर,विशाल जाधव,संदेश कांबळे यांसह आदींनी त्यांचा यथोचित सत्कार करुन पुढील सेवाकार्यासाठी शुभेच्छा दिल्या…

उत्तम बाबळे,संपादक
मराठवाडा महासचिव आणि सर्व सन्माननिय पदाधिकारी बांधव राष्ट्रीय पुरोगामी पत्रकार संघ तालुका शाखा भोकर

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *