विकासासाठी कंधारची कृषी उत्पन्न बाजार समिती खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या ताब्यात द्या- प्रवीण पाटील चिखलीकर

 

प्रतिनिधी, (कैलास शेटवाड)

कंधार येथील कृषि उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक निवडणूक 2023 च्या अनुषंगाने राष्ट्रवादी व शिवसेना तसेच भाजपा युती च्या कृषी उत्पन्न बाजार समिती 2023 च्या प्रचारार्थ भाजप युवानेते प्रवीण पाटील चिखलीकर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या विकासासाठी लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या ताब्यात द्या असे प्रतिपादन ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज येथे भव्य दिव्य सत्कार ग्रामपंचायतीने केल्यानंतर त्यांनी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या बाबतीत आवाहन केले .

खासदार प्रतापराव पाटील यांनी केलेल्या कामाची पावती कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीतून द्यावी असे आवाहन हमाल मापारी व तसेच ग्रामपंचायत सदस्य सरपंच व तसेच सोसायटीचे चेअरमन सदस्य इतर सर्वांना ही आवाहन केले .

प्रवीण पाटील चिखलीकर सर्व सन्माननीय कार्यकर्ते व त्यांचे सहकारी यांनी या ठिकाणी आपल्या भाषणातून निशाणी बाबत आणि निवडणुकीबाबत योग्य असे मार्गदर्शन केले.

भगवानरावजी राठोड साहेब(भाजपा तालुका अध्यक्ष कंधार, ग्रामपंचायत सदस्य पेठवडज, ग्रामपंचायत कार्यालय पेठवडज यांचे वतीने (सार्वजनिक) मा.श्री. प्रवीण रावजी प्रतापराव पाटील चिखलीकर यांचा भव्य दिव्य सत्कार करण्यात आला.

 

गावातील नागरिक,व्यापारी व तसेच सर्व ग्रामपंचायत सदस्य व सदस्या व सोसायटीचे सदस्य व सदस्या व तसेच सर्व सरपंच व तसेच‌ सर्व सर्कल मधील सर्व ग्रामपंचायत सदस्य व सदस्या व सोसायटी चे चेअरमन आणि सदस्य व सदस्या व सर्व सर्कल मधील व गावातील व्यापारी,हमाल/मापाडी

व गावातील व सर्कल मधील सर्व नागरिक व महिला मंडळ आणि सोसायटीचे प्रतिनिधि,व संबंधित सर्व गावातील परिसरातील व बाहेरिल प्रतिनिधी व प्रतिष्ठित नागरिक व महिला मंडळ , सर्व लोक प्रतिनिधी, व त्यांचे उपस्थितित कार्यक्रम पार पडला .

दि.०३/०८/२०२३ रोजी होणाऱ्या कृषी उत्पन्न बाजार समिती सार्वत्रिक 2023 रोजी होणाऱ्या निवडणूक
करिता मोठ्या लोकसंख्येने नागरिकांनी व सर्व बाजार समितीत मतदान करणारे बांधवांनी हजेरी लावली होती.व सदरील कृषी उत्पन्न
बाजार समिती 2023 सार्वत्रिक निवडणूक च्या अनुषंगाने माननीय श्री संभाजी पा.वेंकटराव पा. डावकोरे यांनी सूत्रसंचालन करून कार्यक्रमाचे सांगता करून आभार व्यक्त केले .

 

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *