खादी खरेदी वरील २०% रिबेटचा संजय भोसीकर यांच्या हस्ते शुभारंभ

 

कंधार  ; प्रातिनिधि

राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त खादी ग्रामोद्योग समिती नांदेड च्या वतीने २ ऑक्टोंबर गांधी जयंती निमित्त खादी उत्पादनावर २०% रिबेट देण्यात येते या रिबेट चा शुभारंभ कंधार येथे संजय भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आला

 

खादी भंडार कंधार येथे राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या प्रतिमेचे पूजन, पुष्पहार अर्पण व अभिवादन करुन खादी खरेदी वरील २०% रिबेट चा शुभारंभ नांदेड जिल्हा कॉग्रेस कमिटिचे सरचिटणीस संजय भोसीकर यांच्या हस्ते करण्यात आला

 

यावेळी हमीदोदिन मौलीसाब,कॉग्रेस सेवा दलाचे तालुका अध्यक्ष रमेशसिंह ठाकुर,व्यवस्थापक प्रफ्फूल भागानगरे,प्राचार्य किरण बडवणे,युवक काँग्रेसचे शहराध्यक्ष अजय मोरे,तालुका कॉग्रेस कमिटिचे सरचिटणीस सुरेश कल्लाळीकर,प्रदिप इंगोले,नवनाथ बनसोडे,तारकेश तपासे, देवीदास राठोड आदी सह खादी प्रेमी उपस्थित होते

 

कंधार येथील भांडार मध्ये विविध खादीचे उत्पादने ठेवण्यात आले असून यामध्ये खादीचे शर्टींग रेडिमेड शर्ट पँट सुटिंक जॅकेट राष्ट्रध्वज टॉवेल लुंगी चादर सतरंजी इत्यादी उपलब्ध आहेत या उत्पादनाची खरेदी २०% रिबेट चा लाभ घेऊन मोठ्या प्रमाणावर करावे असे आवाहन संजय भोसीकर यांनी केले

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *