नवरात्रीचे नउ रंग .. त्या रंगाच्या आम्ही रोज नवनवीन साड्या नेसतो , सोशल मिडीयावर शेअर करतो.. अनेक छान छान कमेंट्स येतात.. पुन्हा हुरूप येतो.. आम्ही स्त्रीया व्यस्त कामातुन आपली हौस भागवतो.. प्रत्येकीचा तिचा तिचा वेगळा अंदाज असतो.. वेगळा ढंग असतो .. अनेक जणीनी त्यावर खुप खर्च केलेला असतो.. अनेकजणी प्रोफेशनल शुटकरुन घेतात हे सगळं उत्तमच आहे.. आयुष्यात आनंद हवा.. बदल हवा .. प्रत्येकाच्या आनंदाच्या व्याख्या वेगळ्या असल्या तरीही सोशल मिडीयावर दुसऱ्या स्त्रीला मेंटल टॉर्चर करुन आनंद घेणाऱ्या स्त्रीयांना दुर्गा मा संबोधायचं का ??..
हा प्रश्न आपण प्रत्येकीने स्वतःला विचारुयात.. ज्या स्त्रीवर अशा प्रकारचे शाब्दीक शिंतोडे उडवले जातात ती स्त्री निमूटपणे तिचं काम करत असते.. ती स्वतःला घडवण्यात व्यस्त असते.. स्वतःला घडवताना ती समाजाला घडवण्यासाठी एक पाऊल पुढे टाकते.. तिचे सोशल मिडीयावरचे फोटो एका वॉलवर शेअर करुन त्यावर १०० जणी चकाट्या पिटत बसतात आणि विशेष म्हणजे त्यामध्ये लेखिका , डॉक्टर यांचा समावेश असावा यासारखी खेदकारक गोष्ट कुठली असावी ना…झोपडपट्टीतल्या स्त्रिया सुध्दा असं कृत्य करणार नाहीत .. जेव्हा माझा वाचक हे सगळं मला शेअर करतो तेव्हा अशा महिलांची किव येते कारण हेच उलटुन एक दिवस स्वतःकडे येणार आहे ही भिती सुध्दा नाही.. आपल्यातील कमतरता अशा पध्दतीने व्यक्त करुन स्त्रीत्व मिळवण्यात कसलं शहाणपण आलय.. कधीही कोणीही दाखवुन द्यावं कुठल्याही कोणाच्याही पोस्टवर माझी एकही विचित्र कमेंट नसते.. मी कधीही कोणाला भेटत नाही.. कोणाशी फार संपर्कात नसते कारण या गोष्टीसाठी माझ्याकडे वेळ नाही आणि मला वाचन , व्यायाम , लिखाण या सगळ्यातुन माझ्या वाचकांना सतत काहीतरी उत्तम द्यायचं असतं… तुम्हीही व्यायाम करुन उत्तम फीजीक मिळवा.. तुम्ही चांगलं कार्य करुन फॅन फॉलोवर वाढवा मला आनंदच होइल..
या सगळ्या गोष्टी आपोआप आपल्याकडे येत नाहीत मग त्यासाठी जेलसी का ??.. आपण माझ्यासकट प्रत्येकजण जर एकमेकांना काही देउ शकत नाही तर मग निदान जे आपल्याकडे उलटुन येणार आहे त्याची भिती बाळगा .. कोणीही पूर्णपणे चांगली नाही.. मी स्वतःही नाही.. पण माझ्याकडे असलेल्या उत्तम क्वालीटीज घेउन तुमचं आयुष्य समृद्ध करा.. मी प्रत्येकीचा आदर करते.. आणि एवढ्या ड्रीग्रीज असुन एवढी साधी गोष्ट कळत नसेल की कोणीही कोणाच्याही आयुष्यातील कुठलीही गोष्ट काढुन घेउ शकत नाही मग हा आटापिटा का ??.. स्पर्धा फक्त आणि फक्त आपली आपल्याशी असावी … आपण दुसऱ्याशी स्पर्धा करु शकत नाही सखीनो.. आईचे पाहुन मुलगीही तशीच वागणार .. कोणाही बद्दल जेलसी असण्यापेक्षा आनंद हवा.. समाधान हवं.. दुसऱ्याला काहीतरी मिळावं ही वृत्ती असेल तरच आपल्याला सगळं मिळेल.. माझ्यावर चकाट्या पिटुन तुमचा मौल्यवान वेळ वाया घालवल्याने मला काहीच फरक पडत नाही पण तुम्ही मागे रहाल.. प्रत्येकीने पुढे जा.. अजुन सुंदर दिसा.. स्वभावाने अजुन सुंदर व्हा.. निगेटिव्ह लोकांच्या संपर्कात राहु नका.. दुसरीचा आदर करायला मन धजावत नसेल तर अनादर तरी करु नका..
सगळ्यात महत्वाचं तुमच्या फालतु कमेट ने माझ्या कुटुंबालाही काहिही फरक पडणार नाही.. आम्ही सगळे याच्या पलीकडे आहोत.. तुम्ही काळजी घ्या आणि खरच एकदा दुर्गा आहोत का याचा जरूर विचार करा.. बाह्यांग दुर्गेचं असुन काहीही उपयोग नाही तर अंतरंग दुर्गेचं असायला हवं..
मस्त नटा आणि कायम सुखी रहा हीच इच्छा..
ही पोस्ट लिहीताना कोणाही बद्दल मनात राग नाही पण तुम्ही स्वतःला बदलावं हीच मनोमन इच्छा आहे.. जरुर विचार करा..
सोच बदलो.. देश बदलेगा..
सोनल गोडबोले
.