धर्मापुरी ( प्रतिनिधी ) येथील कै शंकरराव गुट्टे महाविद्यालयात दि १६ आँक्टो २३ रोजी सकाळी ११:००वाजता प्रा मुंडे एस जी भौतिकशास्त्र विभाग प्रमुख यांनी चंद्रयान ०३ या मोहिमेवरती महाविद्यालयातील सर्व शाखेच्या विद्यार्थ्यांना चंद्रयान ०३ च्या उड्डाणापासून ते चंद्रावरील उतरण्यापर्यंतची सर्व माहिती व्याख्यानाद्वारे अतिशय चांगल्या आणि सुटसुटीत भाषेमध्ये समजावून सांगितली व या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थाध्यक्ष शिवाजीराव गुट्टे व प्रमुख उपस्थिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ होळंबे टी एल होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन डॉ पी डी देशमुख व आभार प्रदर्शन डॉ शिंदे एस वाय मँडम यांनी केले.
सदरील कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी महाविद्यालयातील प्राध्यापक चाटे एन एस, दराडे जी एस, चाटे एस जे, डॉ कासारे एस एल, मुंडे ए डी, नरवडे एम व्ही आणि आमलापुरे बी के इत्यादींचे सहकार्य लाभले.