(नांदेड ; प्रतिनिधी )
आज दिपावली निमित्त लोहा कंधार मतदारसंघाचे लोकप्रिय आमदार श्यामसुंदर शिंदे,शेकाप महिला प्रदेशाध्यक्षा सौ. आशाताई श्यामसुंदर शिंदे, लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती विक्रांत पा. शिंदे, माजी जि.प. सदस्य तथा लोहा कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चंद्रसेन पाटील यांनी महाराष्ट्र राज्याचे माजी मुख्यमंत्री माननीय अशोकरावजी चव्हाण व माजी आमदार सौ.अमिताभाभी चव्हाण यांची दिपावली निमित्त सदिच्छा भेट घेऊन शुभेच्छा दिल्या,
यावेळी माजी राज्यमंत्री डी.पी.सावंत, मा.आ.अमरनाथ राजूरकर यांची प्रमुख उपस्थिती होती यावेळी चव्हाण कुटुंबीयांच्या वतीने आमदार श्यामसुंदर शिंदे यांचा सपत्नीक सत्कार करण्यात आला .