कंधार ; प्रतिनिधी
भारतीय जनता पार्टी नांदेड सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक पदी रजत शहापुरे यांची नियुक्ती करण्यात आली.
खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांचे कट्टर खंदे समर्थक निकटवर्तीय विश्वासू म्हणून ओळखले जाणारे रजत शहापुरे यांच्या कडे कंधार शहर भाजपा सोशल मीडिया प्रमुख म्हणून जबाबदारी देण्यात आली होती.त्यांनी ती जबाबदारी व्यवस्थीत सांभाळून जनतेपर्यंत विकास कामे करत गोरगरीब जनतेसाठी कामेही केली व न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला. त्यांनी केलेल्या कामाची दखल घेत त्यांना भारतीय जनता पार्टी सोशल मीडिया जिल्हा सहसंयोजक पदी नियुक्ती करण्यात आली आहे.
या निवडीबद्दल नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर, लोहा कंधार विधानसभा प्रमुख प्रविण पाटील चिखलीकर, महाराष्ट्र भाजपा महिला आघाडीच्या उपाध्यक्षा सौ प्रणीताताई देवरे चिखलीकर,भाजपा जिल्हाध्यक्ष संतुकराव हंबर्डे, भाजपा तालुकाध्यक्ष किशन डफडे, भाजपा जिल्हा उपाध्यक्ष भगवान राठोड, भाजपा शिक्षक आघाडी तालुकाध्यक्ष राजहंस शहापुरे, भाजपा जिल्हा विस्तारक गंगाप्रसाद यन्नावार,लोहा कंधार विधानसभा विस्तारक साईनाथ कोळगीरे यांनी अभिनंदन केले.या निवडीबद्दल मित्र मंडळ यांनी सत्कार करून शुभेच्छा दिल्या.