नांदेड ;
भारतीय जनता पार्टी नांदेड यांच्या वतीने जिल्ह्यातील इयत्ता दहावी व बारावी परीक्षेत 80%पेक्षा जास्त गुण मिळवलेल्या युवकांना प्रोत्साहित करण्यासाठी विद्यार्थ्यांना घरपोच सन्मान करण्यात येणार आहे.दि.११ सप्टेंबर रोजी नांदेड जिल्ह्याचे लोकप्रिय खासदार आदरणीय प्रतापराव पाटील चिखलीकर यांच्या
नांदेड येथील संपर्क कार्यालयात प्रातिनिधिक स्वरूपात नांदेड जिल्ह्यातील गुणवंतांचा सत्कार करण्यात आला.
तसेच उर्वरित गुणवंतांचे सत्कार घरपोच कार्यकर्ते मार्फत घरी जाऊन करण्यात येणार आहे. गुणवंत्ताचा सन्मान अभियान अंतर्गत गुणवंतांचा सन्मान सोहळा दि.११ सप्टेंबर रोजी आयोजित करण्यात आला होता. त्यामध्ये विद्यार्थ्यांचा सन्मान करताना आदरणीय खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर , भाजपा महानगरअध्यक्ष प्रविणभाऊ साले,युवामोर्चा जिल्हाध्यक्ष किशोरभाऊ देशमुख,धर्मभुषण दिलीपभाऊ ठाकूर,राजहंस शहापुरे,आयोजक सुनील रामदासी,प्रल्हाद उमाटे व गुणवंत विद्यार्थी-पालकांची यावेळी उपस्थिती होती.