बालाजी पेठकर यांची राष्ट्रवादीच्या जिल्हा चिटणीस पदी निवड.

 

कंधार | धोंडीबा मुंडे

राष्ट्रवादी कॉंग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष अजितदादा पवार, खासदार सुनिलजी तटकरे,प्रदेश अध्यक्ष राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी यांच्या मान्यतेने जिल्हा राष्ट्रवादी कॉंग्रेसच्या जिल्हा चिटणीस पदी बालाजी पेठकर यांची निवड झाली आहे.दि.१८ एप्रिल २०२४ रोज गुरुवारी नियुक्तीपत्र देऊन सत्कार करण्यात आला,

पेठकर हे कृषी विभागातील ट्रेसर (अनुरेखक ) संघटना नांदेड जिल्हाध्यक्ष पदी कार्यरत होते,तसेच केळी व लिंबोणी या फळपिकांसाठी,जिल्हा,
राज्यस्तरावर विविध पुरस्कार त्यांना प्राप्त झाले आहेत,
त्यांच्या निवडी बद्दल राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य उपाध्यक्ष हरिराव भोसीकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राज्य सरचिटणीस भाऊसाहेब गोरठेकर,राष्ट्रवादी काँग्रेस जिल्हाध्यक्ष ग्रामीण दक्षिण नांदेड माधवराव धर्माधिकारी,राष्ट्रवादी काँग्रेस तालुकाध्यक्ष कंधार मनोहर पाटील भोसीकर,राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे उपजिल्हाध्यक्ष शिवकुमार भोसीकर, शिवदास धर्मापुरीकर, शंकरराव देशमुख,डॉ.दिनकर जायभाये,माधवराव मुंडे,भगवानराव किडे,यांनी अभिनंदन करून पुढील वाटचालीस शुभेच्छा दिल्या आहेत,निवडी बद्दल सर्वत्र अभिनंदन होत आहे,

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *