रिल्स स्पर्धेत गिरी गजानन यांचा प्रथम क्रमांक.

नांदेड जिल्हा लोकसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 स्वीप कक्षाअंतर्गत मतदार जनजागृती निमित्त, दिनांक 22 एप्रिल 2024 रोजी. जिल्हा पोलीस मुख्यालय, पोलीस परेड ग्राउंड, नांदेड येथे लोकशाही बळकट करण्यासाठी व मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी आयोजित करण्यात आलेल्या रील स्पर्धेत गिरी गजानन यांची प्रथम निवड करण्यात आली.
यावेळी, जिल्हाधिकारी तथा जिल्हा निवडणूक निर्णय अधिकारी, नांदेड मा. अभिजीत राऊत, मुख्य कार्यकारी अधिकारी जि. प. तथा स्वीप जिल्हा नोडल अधिकारी, (ग्रामीण) नांदेड मा. मीनल करनवाल, पोलीस अधीक्षक मा. श्रीकृष्ण कोकाटे, मनपा आयुक्त तथा स्वीप जिल्हा नोडल अधिकारी, (शहरी) नांदेड डॉ. महेश कुमार डोईफोडे यांच्या हस्ते गिरी गजानन यांचा सन्मान करण्यात आला.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *