शालेय पोषण आहार अधिक्षक कंधार वर्ग-२ मा.सुरेशराव जाधव 

कंधार ; प्रतिनिधी

प्रत्येकांच्या जीवनात अनेक प्रसंग व घटना घडतात. त्यावर मात करुन जो संघर्षातून आयुष्यात यशस्वी होतो.याचे उत्तम उदाहरण म्हणजे भगवान श्री शिवशंकराच्या पवित्र नगरी बारुळ,ता.कंधारचे भुमीपूत्र,कंधार तालूक्याचे शालेय पोषण आहार अधिक्षक वर्ग-२ मा.सुरेशावजी जाधव साहेब यांची. दि.२१ ऑगस्ट २०२४ रोजी १२:३० वाजता.श्री शिवाजी हायस्कूल हु.माणिकराव काळे रोड कंधार येथे शालेय पोषण आहार योजनेची तपासणी करण्यासाठी आले असता सदिच्छा भेट झाली.श्री शिवाजी मोफत एज्युकेशन सोसायटी कंधार या संस्थेतील शाखा श्री शिवाजी माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय बारुळ,ता.कंधार या ज्ञानालयात कर्तव्य बजावत असतांना सन २००१ साली एक जीप अपघातात बारुळ नगरीच्या दत्ता पाटील जाधव यांचे चिरंजीव मा.सुरेशराव जाधव हे सापडले होते.

 

 

त्यावेळी ते नुकतेच पदवीचे शिक्षण पूर्ण करुन बारुळ नगरीत आल्यानंतर त्यांचे दाजीबा डाॅ.वडजे साहेब यांच्या दवाखान्याचे उद्घाटन झाले.तेव्हा प्राथमिक आरोग्य केंद्र बारुळ येथील एका पेशंटला कंधार ग्रामीण रुग्णालयात उपचारासाठी जीपने कंधारकडे येतांना चौकी धर्मापूरी ते चिंचोली(प.कं) या दोन गावा दरम्यानच्या रस्त्यावर अपघात होऊन सुरेशराव जाधव हे गंभीर जखमी झाले.त्यातून सावरण्यास कांही वेळ गेला.ते खचुन न जाता बारुळ नगरीत शिकवणी घेत आपला थोडा कमी झालेला आत्मविश्वास त्यांनी हळूहळू वाढविण्यास आरंभ केला.त्या कामी श्री शिवाजी उच्च माध्यमिक विद्यालयाचे प्रा. नरेद्र नरवाडे सर यांनी मोलाचे मार्गदर्शन अनेक मान्यवरांनी केल्यामुळेच जाधव सरांनी एम.पी.एस.ई परीक्षेत यश मिळवून आज वर्ग-२ या पदापर्यंत मजल मारता आली.त्यांचे शरीर त्यासाठी मर्यादा आणत होते.

तरी पण त्यांनी जिद्दीने या उद्भवलेल्या परिस्थितीवर आपल्या बुद्धीकौशल्यावर मात करत आज संघर्षातून मार्गक्रमण करत २४ वर्षाचे उत्कृष्ट जीवन जगत येणाऱ्या पिढीला आपला नक्कीच आदर्श वाटावा असा जीवन प्रवास करणारा अधिकारी अवलियास या डोंगरदऱ्याच्या अन् मन्याड खोर्‍याच्या शिक्षण विभागाला मिळाल्याने आज त्यांनी आपल्या कतृत्वाची छाप जनसामान्यांवर आणि प्रशासकीय विभागात निर्माण करुन एक आदर्श अधिकारी असावा कसा याचे जिवंत उदाहरण म्हणजेच मा.सुरेशराव जाधव सर आहेत.आज त्यांच्या सोबत मा.परमेश्वर बोरीकर डाटा एंट्री ओपरेटर उपस्थित होते.

 

शालेय पोषण आहाराची तपासणी केल्यानंतर बाहेर वटवृक्षाराजाच्या पारावर चर्चा रंगली असता बारुळ येथील कांही जुन्या आठवणींना उजाळा मिळाल्याने ही भेट ठळकच झाली.मोबाईलवर अन् सोशल मीडियावर होणारी भेट आज प्रत्यक्ष झाल्याने अत्यानंद झाल्याने समाधान वाटले. या प्रसंगी श्री शिवाजी हायस्कूल कंधारचे मुख्याध्यापक सदाशिवराव आंबटवाड सर,डिजीटल शिक्षक सुरेशराव इरलवाड सर, हे अनमोल क्षणचित्र सारथी वापरले यांनीच टिपले आहे.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *