कंधार ; आज लोहा कंधार मतदार संघातील “महाराष्ट्र राज्य समिती” (M.R.S.) पक्षाच्या प्रमुख कार्यकत्यांच्या बैठकीत दिनांक 4 सप्टेंबर रोजी नांदेडला होनारे राज्यस्तरीय अधिवेशन महाराष्ट्रात होनाऱ्या विधानसभा निवडणुकीत राजकीय परिवर्तन घडविनारे ठरेल असा ठाम विश्वास महाराष्ट्र राज्य समिती पक्षाचे प्रमुख शेतकरी नेते माजी आमदार शंकर अण्णा धोंडगे यांनी आज दि.२६ रोजी कंधार येथे व्यक्त केला.
नांदेडला होणारे राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशन हे महाराष्ट्र पातळीवर स्थापण झालेला परिवर्तन आघाडीच्या वतीने होत असुन महाराष्ट्र राज्य समिती, स्वाभिमानी शेतकरी संघटना, शेतकरी संघटनेचा स्वतंत्र भारत पक्ष, तसेच इतरही अनेक सामाजिक राजकीय संस्था परिवर्तन आघाडीत सामील झाल्या असुन अशा अनेक समविचारी पक्ष व संघटनाही आमच्या संपर्कात असल्याचे शंकर अण्णा धोंडगे यांनी सांगितले या पंचवार्षीक काळात महाविकास व महायूती या दोन्ही आघाडयांची अलटून पलटून सतेत आले.
या कार्यकाळात राज्याच्या विकासाचे गाडे तर थांबलेच असुन, शेतकऱ्यांचे, बेरोजगाराचे, व सामाजिक प्रश्न यांनी गंभीर केल्यामुळे महाराष्ट्रातील जनतेच्या मनात या दोन्ही आघाड्यांच्या बाबतीत असांतोष असल्यामुळे राज्यात शेतकऱ्यांचे कष्टकऱ्यांचे बेरोजगारांचे व सामार्थ्य जनतेचे, सामाजीक प्रश्न प्रामाणिक पणे सोडवण्यासाठी एक सक्षम व गुणवतेचा राजकीय पर्याय ही परिवर्तन आघाडी देईल असा विश्वासही या बैठकीत शंकर अण्णांनी विश्वास दिला.
शेगाव येथे परिवर्तन आघाडीचा प्रथम मेळावा दिनांक 24 ऑगस्ट रोजी मोठ्या प्रमाणात यशस्वी झाला असुन दिनांक 4 सप्टेंबर 2024 बुधवारी 1 वाजता नवा मोंढा नांदेडच्या मैदानावर होनाऱ्या राज्यस्तरीय शेतकरी अधिवेशनात राज्यभरातून किमान 50 हजार प्रतिनिधी हजर राहनार असुन या अधिवेशनाचे यजमान पद आपल्याकडे असल्यामुळे लोहा कंधार मतदार संघातील तर्व कार्यकत्यांनी आज पासुनच तन-मन धनाने त्याच्या प्रचार व प्रसार कार्याची सुरुवात करावी व हे अधिवेशन यशस्वी करावे असे अवाहन शंकर अण्णा धोंडगे यांनी केले.
बैठकीच्या सुरुवातीलाच नांदेड लोकसभेचे दिव्यंगत खासदार वसंतराव चव्हाण यांना भावपूर्ण श्रध्दांजली आर्पीत करण्यात आली.बैठकीत दत्ता पवार , ॲड . विजय धोंडगे ,डॉ सुनिल धोंडगे , दिलीप दादा धोंडगे , शिवा भाऊ धोंडगे , यांच्यासह लोहा कंधार मतदार संघातील शेकडो कार्यकर्ते उपस्थित होते.