अहमदपूर ( प्रतिनिधी ) येथील छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपची एक दिवसीय पावसाळी सहल काल रविवार दि 25 आॅगस्ट 24 रोजी खेळिमेळीच्या वातावरणात संपन्न झाली. महापुरुषांच्या नावावर असणारा आणि त्यांच्याच विचारांवर चालणाऱ्या या ग्रुपच्या सहलीची सुरुवात छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुर्णाकृती पुतळ्यास अभिवादन करून झाली.
ही पावसाळी सहल मांजरसुंभा ता जि बीड येथे गेली होती. या सहलीत एकूण 36 जण सहभागी झाले होते. यासाठी छत्रपती शाहू राजे योगा ग्रुपचे अध्यक्ष एन डी राठोड आणि अविनाश मंदाडे यांनी पुढाकार घेतला. कोमल साडी सेंटरचे शिवाजीराव सुर्यवंशी,अशोकराव चापटे यांनी मार्गदर्शन केले.
सुरुवातीला या गुलाबी ग्रुपने परळी वै येथील राज्यस्तरीय कृषी प्रदर्शनास भेट दिली आणि उत्साहाने खरेदी केली.
वैद्यनाथाच्या पायरी दर्शनानंतर ती कपिलधारला रवाना झाली. परतीच्या प्रवासात माऊली महाराज यांचे चाकरवाडी येथे दर्शन घेतले. या सहलीचे सारथ्य गजानन पाटील यांनी केले. विलास पडिले,डी एस वाघमारे, धोंडीराम इरलापल्ले, गणेश वाघमारे, सचिन लव्हराळे, मधुकर जोंधळे, एल डी कांबळे, पायलट कदम,माने सर, हिरामण धसवाडीकर आणि प्रा भगवान आमलापुरे सहभागी होते.