कंधार/( दिगांबर वाघमारे )
श्री क्षेत्र उमरज(धाकटे पंढरपूर) येथे श्री संत नामदेव महाराज मठ संस्थानच्यावतीने दरवर्षी प्रमाणे याही वर्षी श्रीकृष्ण जन्म सोहळा व संत नामदेव महाराज जन्मोत्सवा निमित्त सोमवार दि.२६ रोजी मठ संस्थान उमरज येथे मोफत आरोग्य शिबिर व रक्तदान शिबिर राबविण्यात आले.या शिबिरात १२०० भाविकांची तपासणी केली. व १२२ तरुणांनी व ४ महिलांनी रक्तदान केले.
कंधार,लोहा,नांदेड येथील तज्ञ दहा डॉक्टरांनी तपासणी करुन त्यांच्यावर मोफत औषधोपचार करण्यात आले.यावेळी दर्जेदार औषध वाटपामुळे रुग्णांनी समाधान व्यक्त केले.त्याचबरोबर १२२ तरुणांनी व ४ महिलांनी रक्तदान करून राष्ट्रीय कार्यास हातभार लावला.
नांदेड येथील हृदयरोग तज्ञ.डॉ.व्यंकटेश दुब्बे,डॉ.संतोष राठोड,डॉ.दिपक मोहीते,प्राथमिक आरोग्य केंद्र कुरुळा येथील सर्व डॉक्टर,नर्स,आरोग्य कर्मचारी उपस्थित होते. नंदिग्राम ब्लड बँक नांदेड येथील सर्व कर्मचाऱ्यांनी ब्लड संकलीत केले.संस्थानचे मठाधिपती एकनाथ नामदेव महाराज यांनी सर्व डॉक्टरचे व रक्तदान केलेल्या तरुणांचे आभार मानले.