(कंधार ; दिगांबर वाघमारे )
गटसाधन केंद्र कंधार येथे गटशिक्षण अधिकारी श्री संजय येरमे साहेब यांच्या प्रमुख उपस्थितीत केंद्रप्रमुख ,मुख्याध्यापक यांची बैठक आज दि.27 ऑगस्ट रोजी घेण्यात आली . सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात यावे तसेच सखी सावित्री समिती स्थापन करण्यात यावी , शिक्षकेत्तर कर्मचाऱ्यांचे चरित्र्य प्रमाणपत्र बंधनकारक करावे यासह शाळेतील सर्व वयोगटातील मुली व महिला शिक्षिका यांच्या सुरक्षेबाबत कडक सुचना गटशिक्षण अधिकारी श्री संजय येरमे यांनी दिल्या .
तसेच माझी शाळा सुंदर शाळा , महावाचन अभियान , उल्हास ॲप , युडायस प्लस आदीची माहिती ही यावेळी गटशिक्षण अधिकारी श्री संजय येरमे साहेब यांनी माहिती दिली .तसेच यावेळी शालेय पोषण आहारात खिर बनवणे यासह नविन मेनू प्रमाणे आहार शिजवण्याचे अधिक्षक सुरेश पाटील जाधव यांनी सांगितले . दरम्यान शिवकुमार कनोजवार यांनी नवभारत साक्षरता कार्यक्रम NILP यावर मार्गदर्शन केले . तर आनंद तपासे यांनी युडायस प्लस 2024-2025 अपडेट बाबत सुचना दिल्या .