धर्मापुरी (प्रतिनिधी ) येथील कै शं गु ग्रामीण महाविद्यालयात आज दि 23 आॅगस्ट 24 रोजी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर चा 66 वा वर्धापन दिन उत्साहात साजरा करण्यात आला. यानिमित्ताने सकाळी ठीक 09: 00 वाजता प्राचार्य डॉ होळंबे टी एल यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले.
या नंतर सांस्कृतिक सभागृहात एक कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ होळंबे टी एल आणि प्रमुख पाहुणे म्हणून प्रा भगवान आमलापुरे यांची प्रमुख उपस्थिती होती. प्रथमतः मान्यवरांच्या हस्ते डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले. प्रा भगवान आमलापुरे यांनी डॉ बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजी नगर च्या वर्धापन दिनानिमित्त उपस्थित सर्वांना शुभेच्छा दिल्या आणि महाविद्यालयाच्या रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त दिसणारे विधायक बदल मांडले.
अध्यक्षीय समारोप करताना डॉ होळंबे टी एल यांनी विद्यापीठ स्थापन करण्याचा हेतू आणि संघर्ष सांगून शिक्षणाचे महत्त्व सांगितले. प्रा डॉ रमाकांत गजलवार यांनी प्रास्ताविक आणि सुत्रसंचलन केले तर प्रा मुंडे एस जी यांनी आभार मानले.कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रा डॉ फड ए आर सांस्कृतिक विभाग प्रमुख प्रा डॉ चाटे टी व्ही,प्रा मोमले आर जी आणि बळीराम पेन्टुळे यांनी परिश्रम घेतले.