अहमदपूर : अहमदपूर अंबाजोगाई राज्य रस्ता क्रमांक 165 कोवीड 19 अर्थात जागतिक कोरोना महामारीपुर्वी दोन पदरी आणि सिमेंट काॅंक्रीटचा झाला आहे. पण या नवीन राज्य रस्त्यावर अनुक्रमे कोपरा आणि पिंपळा धायगुडे येथील विजवाहीनी तार गेली 03 /04 वर्षांपासून अद्याप वर उचलून घेतली नाही. त्यामुळे कोपरा येथील नवीन पुल चारचाकी गाडी आणि इतर मोठ्या वाहनांच्या वाहतुकीसाठी खुला करण्यात आला नाही. परिणामी वाहतूक जुन्या पुलावरूनच चालू आहे. त्यातही या जुना रस्ता संततधार पावसामुळे जास्तच खराब होऊन मोठमोठे खड्डे पडले आहेत. त्यामुळे वाहन चालक आणि वाहन धारकांना मोठी कसरत करावी लागत आहे. त्याचं हे प्रा भगवान आमलापुरे यांनी घेतलेलं छायाचित्र.