धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे )
येथील कै शं. गु. ग्रामीण कला, वाणिज्य व विज्ञान महाविद्यालयातील रसायनशास्त्राचे तज्ञ प्राध्यापक प्रा. भागवत रामकिशन गुरमे यांना नुकतीच डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ छत्रपती संभाजीनगरने ( पीएच डी) विद्यावाचस्पती ही शिक्षण क्षेत्रातील सर्वोच्च पदवी प्रदान केली आहे. त्याबद्दल त्यांचा यथोचित सत्कार करण्यात आला. प्रा. भागवत गुरमे यांनी डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ, छत्रपती संभाजीनगर ला Study of Kinetics and Mechanism of Oxidation of Metal Complexes ( स्टडी ऑफ कायनेटिक अॅड मेकॅनिझम ऑफ ऑक्सीडेशन ऑफ मेटल कॉम्पलेक्सेस ) या विषयावर संशोधन प्रबंध सादर केला होता. त्यास विद्यापीठाने मान्यता दिली आहे. दि १६ डिसें २०२५ रोजी त्यांची मौखिक परिक्षा पार पडली.त्यांना डॉ. सय्यद हुसेन, छत्रपती संभाजी नगर यांनी मोलाचे मार्गदर्शन केले. त्याबद्दल त्यांचा जय भगवान सेवाभावी संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. शिवाजीराव गुट्टे यांनी पुष्पहार घालून,शाल पांघरूण आणि पेढा भरवून सत्कार केला. त्यावेळी प्राचार्य डॉ. होळंबे टी एल, प्रा. डॉ. पांडुरंग मामडगे, ग्रंथपाल दराडे जी एस, प्रा डॉ देशमुख पी डी, प्रा भगवान आमलापुरे आणि प्रा मुंडे जी आर आणि इतर प्राध्यापकवृंद उपस्थित होते.दरम्यान प्रा. डॉ रमाकांत गजलवार, प्राध्यापक आणि प्राध्यापकेत्तर कर्मचार्यानी त्यांचे अभिनंदन करुन शुभेच्छा दिल्या आहेत.

