नांदेड, दि. ९ जानेवारी :- जिल्हाधिकारी राहूल कर्डीले यांच्या अध्यक्षतेखाली “हिंद की चादर” कार्यक्रमाच्या प्रचार-प्रसिद्धी तसेच इतर अनुषंगिक बाबींविषयी हॉटेल असोसिएशन, विविध व्यापारी संघटना व स्वयंसेवी संस्था (NGO) यांच्या सहभागाने आज जिल्हाधिकारी कार्यालयात आढावा बैठक घेण्यात आली.
या बैठकीत कार्यक्रमाच्या अनुषंगाने करावयाच्या कामांबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. कार्यक्रम यशस्वीरीत्या पार पाडण्यासाठी लागणारे आवश्यक नियोजन, समन्वय व प्रभावी अंमलबजावणीबाबत उपस्थितांना मार्गदर्शन व सूचना देण्यात आल्या. “हिंद की चादर” कार्यक्रम व्यापक स्तरावर पोहोचावा यासाठी सर्व संबंधित घटकांनी सक्रिय सहभाग घ्यावा, असे आवाहन यावेळी करण्यात आले.
०००००#हिंददीचादर
#गुरूतेगबहादुर
#नांदेड
Maharashtra DGIPR
विभागीय माहिती कार्यालय, लातूर
DDSahyadri
Doordarshan National (DD1)
Nanded Police
आकाशवाणी छत्रपती संभाजीनगर
All India Radio News

