कंधार : प्रतिनिधी
अंबुलगा तालुका कंधार येथील तरुण माधव गुंडे यांचे आकस्मिक दुःखद निधन झाले त्यामुळे गुंडे परिवारावर दुःखाचा डोंगर पडला. घरातील कमावता माणूस गेल्याने संकटात गुंडे परीवार आले.आज त्यांच्या कुटुंबीयांची भेट घेऊन सांत्वन करून आर्थिक मदत ,कंधार तालुका कॉग्रेस कमिटीचे अध्यक्ष संजय भोसीकर यांच्या वतीने करण्यात आली.
यावेळी शरद पाटील तेलंग,माजी पंचायत समिती सदस्य रामभाऊ देवकांबळे,माधवराव गित्ते,काँग्रेस सोशल मीडिया विधानसभा प्रमुख सतिश देवकत्ते,प्रल्हाद पाटील गव्हाणे,नगरसेवक सचिन बसवंते, मारोती गुंडे,भीमा पाटील,उपसरपंच सचिन गुद्दे,किरण वाघमारे,नन्हु पाटील गुट्टे,शिवाजी पाटील गिते,बालाजी पाटील वडजे आदीची उपस्थिती होती.

