filter: 0; fileterIntensity: 0.0; filterMask: 0; captureOrientation: 0; algolist: 0; multi-frame: 1; brp_mask:0; brp_del_th:null; brp_del_sen:null; delta:null; module: photo;hw-remosaic: false;touch: (-1.0, -1.0);sceneMode: 2621440;cct_value: 0;AI_Scene: (-1, -1);aec_lux: 0.0;aec_lux_index: 0;albedo: ;confidence: ;motionLevel: -1;weatherinfo: weather?null, icon:null, weatherInfo:100;temperature: 45;
कंधार : प्रतिनिधी
विद्यार्थ्यांच्या बाल मनावर शैक्षणिक बाबी दृढपणे रुजवावी यासाठी क्षेत्रभेट मध्ये शैक्षणिक सहल महत्वाचे ठरते. कंधार शहरातील महात्मा फुले प्राथमिक शाळेची शैक्षणिक सहल दि.13 जानेवारी रोजी संपन्न झाली. चिमुकल्यांनी श्रीक्षेत्र माळेगाव येथे श्री खंडोबा चे दर्शन घेऊन लिंबोटी धरणाची पाहणी चिमुकल्यांनी केली.
संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधार संचलित महात्मा फुले प्राथमिक शाळेत संस्थापक अध्यक्ष प्रा डी एन केंद्रे, सचिव चेतनभाऊ केंद्रे, संचालिका तथा कंधार नगरपालीकेच्या माजी नगराध्यक्षा विद्यमान नगरसेविका सौ अनुराधा चेतन केंद्रे यांच्या मार्गदशनाखाली विविध कार्यक्रम राबवून विद्यार्थ्यांच्या सुप्त गुणांना वाव दिला जातो. त्याचाच भाग म्हणून शैक्षणिक वर्षांत सहल काढण्यात आली.
लिंबोटी धरणाचे दरवाजे पाहणी, पाणीसाठा, धरणाचे महत्व,मासेमारी, आदी बाबीची माहीती क्षेत्रभेट दरम्यान देण्यात आली. नंतर चाकुर येथे अमुजमेन्ट पार्क ला भेट देवून विविध मनोरंजनाची खेळ, साहसी खेळाचा लाभ घेण्यात आला.मुख्याध्यापक दिगांबर वाघमारे यांच्या मार्गदर्शनाखाली सहलप्रमुख राजू केंद्रे यांच्या नेतृत्वाखाली यशस्वी सहल सुखरूप संपन्न झाली. सौ. कागणे यु.एम.,आनंद आगलावे, माणिक बोरकर, मेघा जाधव, शेषेराव सुर्यवंशी यांनी परीश्रम घेतले.

