प्रासंगिक..!!
मानस पुत्रासाठी संघर्ष योध्दा साथी रामराव जाधव
परभणी मनपाच्या निवडणूक प्रचाराच्या मैदानात..!!
या महिन्याच्या ८ जानेवारीला कौटुंबिक कार्यक्रमाच्या निमित्ताने परभणीला जाण्याचा योग जवळपास
दिड वर्षांनंतर जुळून आला.त्या निमित्ताने परभणीला
काही जुन्या सहकारी मित्राच्या भेटी घेता आल्या
तर घेऊन त्यांना भेटुन माझी गेल्या वर्षी प्रकाशित झालेली पुस्तके त्यांना भेट द्यावीत या निमित्ताने
गप्पा माराव्यात,चर्चा करावी म्हणून मी परभणीला
येत असल्याचे फोन करून काही मित्रांना आधीच कळवले होते.८ तारखेचा नातेवाईकाकडील कार्यक्रम
आटोपून ९ तारखेला माझे मार्गदर्शक,एकेकाळचे जेष्ठ
सहकारी,साथी रामराव जाधव यांना फोन करून मी परभणीत आहे तुम्हाला भेटायची इच्छा आहे.असे सांगुन त्यांची वेळ घेवून त्यांना भेटायला रामकृष्ण
नगर येथील निवासस्थानी दुपार नंतर चार वाजता
त्यांच्या घरी गेलो.मला पाहून त्त्यांचा चेहरा
आनंदाने फुलला.औपचारीक गप्पा नंतर दिलखुलास पणे चळवळीतील जुन्या आठवणींना उजाळा देत
गप्पा मारत असताना राज्यात महानगर पालिकेच्या
निवडणूका सुरू असल्याने समाज कारणा सोबतच
राजकारणावर ही ओघानेच चर्चा झाली.आमचे मित्र
व साथी रामराव जाधव यांचे मानसपुत्र डॉ सुनील
जाधव हे परभणी मनपाची निवडणूक महाविकास
आघाडीतील घटक पक्ष असलेल्या शिवसेना ऊबाठा पक्षाकडुन वार्ड क्रमांक १५ मधुन लढवत असल्याची माहिती त्यांनी दिली.व त्याची पण भेट घे असा खरे तर आदेशच दिला.पण निवडणुकीच्या धामधुमीत
त्यांची भेट होणार नाही ते प्रचारात व्यस्त असतील
ही शंका मी साथीना बोलून दाखवली.त्यांनी लगेच
डॉ सुनील जाधव यांना फोन लावला व मी परभणीत
त्यांच्या कडे आलो आहे असा निरोप दिला.व मला त्यांना बोल म्हणुन फोन माझ्या हातात दिला.त्यानी
फोनवर मी प्रचारात व्यस्त असल्याचे सांगून रात्री घरी मुक्कामाला येण्याची विनंती केली.मी पण ठिक आहे
म्हणून त्यांना होकार दिला.व रामराव सोबत पुन्हा
चर्चा सुरू झाली.आमची चर्चा सुरू असतानाच मी
परभणीला आलोय असा निरोप मिळाल्या मुळे माझे
पुर्णा येथील सहकारी मित्र चळवळीतील कार्यकर्ते
लक्ष्मण गायकवाड मला भेटायला म्हणून रामराव
जाधव यांच्या घरी आले.पुन्हा गप्पांचा फड चांगलाच
रगंला चर्चेत रामरावनी सांगितले की मी सकाळीच तीन चार तास सुनीलचा प्रचार करुन आलो आहे.खरे
तर हा माझ्यासाठी आश्चर्याचा धक्काच होता.मी
त्यांना म्हणालो रामराव या वयात अन् प्रचार तुम्हाला
हे कसं शक्य आहे.ते म्हणाले का नाही.? सकाळी
सकाळी बालासाहेब पवारांना सोबत घेऊन रीक्षाने
फिरतो आज खानापूरला जावुन आलो.तुझा फोन
आला तेव्हा मी तीथेच होतो आताच थोड्या वेळापुर्वी
घरी आलो मी म्हणालो या वयात हे कसे शक्य आहे
ते म्हणाले माझा पिंड संघर्षाचा आहे मला दोन वर्षा-
पुर्वी अर्धांगवायू झाला होता मी त्यावर ही मात केली.
आज माझी पृकृती ठणठणीत आहे.मी नामांतराच्या
आंदोलनात जेल भोगली,आणिबाणीत ही जेलमधे
जावुन आलो.मला नुकताच ” संघर्ष योध्दा ” म्हणून
पुरस्कार जाहीर झाला आहे.१७ जानेवारी २०२६ ला
परभणीच्या बी रघुनाथ हाल मधे कार्यक्रमात मला तो
दिला जाणार आहे.तु यायला हवे.मी त्यांना नक्कीच
येईन म्हणालो.विषयांतर होवु नये म्हणून मी त्यांना
परत मुळ मुद्द्यावर आणत विचारले रामराव पण
तुम्हाला या प्रभागाततील लोक ओळखतात का.?
तेव्हा ते त्वेषाने म्हणाले तुला काय म्हणायचे आहे.?
मी याच प्रभागात अनेक वर्षा पासून रहिवासी आहे.! त्या मुळे मला न ओळखनारा माणूस शोधूनही तूला सापडणार नाही.मी आणि माझ्या सहकाऱ्यांनी त्या
वेळी कृषी विद्यापीठाच्या आंदोलनात परभणीला जे
काम केले त्यातून या प्रभागात रेल्वे लाईनच्या बाजूला
कामगारांची वसाहत वसवली आहे आजही तेथील
लोकांच्या मनात माझ्या बद्दल आदराची भावना आहे
खरं वाटत नसेल तर बालासाहेब पवारांना विचारुन
खात्री करून घे.मी नमतं घेत त्यांना म्हणालो दादा मला तुमच्या बद्दल,व तुम्ही केलेल्या कामाबद्दल मला
मला निंतात आदर आहे.शंका घेण्याचे काहीच कारण
जशी जशी चर्चा रंगत गेली तसा तसा कधी वेळ
निघून गेली हे कळलेच नाही..!!
जवळपास दोन तीन तास मनसोक्त गप्पा मारल्या.
शेवटी मीच म्हणालो दादा आता बराच वेळ झाला आहे आता निघायची वेळ झाली आहे असे म्हणुन
मी त्यांचा निरोप घेतला.व चहा घेऊन निघते वेळी
मी त्यांना माझी दोन्ही पुस्तके ” तरंग अंतरीचे ” हा
कविता संग्रह व ” चिंतन एका कार्यकर्त्याचे ” हा लेख संग्रह भेट देवून या लेख संग्रहात ” माझा स्थानिक
स्वराज्य संस्था ” वर लिहिलेला लेख असल्याचे सांगून
त्यांचा निरोप घेवून डॉ सुनील जाधव यांच्या घराकडे
जाण्यासाठी निघालो.मला भेटण्यासाठी पुर्णेवरून
आलेल्या लक्ष्मण गायकवाड यांना ही मी माझी दोन्ही
पुस्तके भेट दिली.व दादाना पुरस्कार मिळाल्याबद्दल
त्यांचे अभिनंदन करून निरोप घेतला.!
व डॉ सुनील जाधव यांच्या घरी मुक्कामाला रवाना
झालो जाण्या पुर्वी माझे सहकारी मित्र बालासाहेब
पवार याना फोन केला त्यानी मी सुनील जाधव यांच्या
घरी आहे तुमची वाट पाहतोय असं सांगितलं.सोबत
असलेले लक्ष्मण गायकवाड हे पुर्णेला जाण्यासाठी
बस स्थानकाकडे गेले व मी सुनील जाधव यांच्या
घरी.! बालासाहेब वाटच पाहत होते.त्यांच्या सोबतच माझे मीत्र वसंतराव नाईक महाविद्यालयाचे इंग्रजीचे
निवृत प्रा.एन.एस.दुधगोंडे सर यांची पण भेट झाली .
सराना पण मी माझी पुस्तके भेट दिली.या सर्व
धामधुमीत संध्याकाळचे नवू कधी वाजले ते कळलेच नाही.दुधगोंडे सर त्यांच्या घरी निघून गेले..!! बालासाहेबानी सुनीलला फोन करून विचारणा केली.
व मला म्हणाले तो रात्री कधी परत येईल ते सांगता येत नाही जेवणाची वेळ झाली आहे आपण जेवण
करून घेवू.मी होकार दिला.सुनीलच्या घरीच जेवण
केले.व बालासाहेबा सोबत त्यांच्या रुममधे झोपायला
गेलो.रात्री बराच वेळ गप्पा मारल्या निवडणूकीत
सुनील साठी पोषक वातावरण असल्याचे त्यांनी
सांगीतले रामराव जाधव यांच्या बरोबर झालेली चर्चा व बालासाहेब पवार यांच्या सोबत झालेली चर्चा या
वरुन परभणी मनपा मधे महाविकास आघाडीची
सत्ता येवू शकते असे मला वाटते.सूनिलची बराच
वेळ पाहीली पण त्याने मला उशीर होणार आहे असे
कळवले.मग बालासाहेबाना चार पाच कविता वाचून
दाखवल्या व शांतपणे झोपुन गेलो.सकाळी लवकर
ऊठुन डॉ सुनील जाधव यांची भेट घेऊन त्यांच्या सोबत चहा घेत चर्चा केली सुनील जाधव यांनी मला
वेळ असेल तर १५ तारखे पर्यंत थांबण्याची विनंती केली पण माझी प्रकृती ठीक नसल्याने मला थांबणे शक्य नसल्याचे सांगुन त्याना शुभेच्छा देवून माझ्या
आधीच ठरलेल्या कार्यक्रमा पणे कवीवर्य शिवाजी
मरगीळ सरांच्या भेटीसाठी त्याना फोन केला.व मी
भेटायला येत असल्याचे सांगितले त्यांचा होकार मिळताच पुन्हा एकदा सुनील जाधव यांना त्यांच्या विजया साठी शुभेच्छा दिल्या व मरगीळ सरांना भेटायला त्यांच्या घरा कडे रवाना झालो.जाताना मनात एकच विचार होता रामराव जाधव यांची जीद्द
त्यांच्यात या वयात असलेला प्रचंड आत्मविश्वास,व
चळवळीतील कार्यकर्त्यावर निस्सीम प्रेम पाहून खरं
तर मी भारावून गेलो व या ८५ वर्षाच्या संघर्ष योध्द्याला मनातल्या मनात पुनश्च एकदा सलाम
करून साथी रामराव जाधव यांच्या बद्दलचा आदर कायम मनात ठेवून ते शतायुषी व्हावेत अशी निर्मिका कडे प्रार्थना करुन हा लेखनप्रपंच ईथेच थाबवतो.!सुनील खंडाळिकर..
अहमदपूर जी.लातूर..
फोन नं ९०११८०४८२८

