जीवन आनंदाने जगायचे असेल तर सकारात्मक दृष्टिकोन नेहमी ठेवावा लागतो.आनंद मिळवण्यासाठी वेळ काढावा लागत नाही. गतकालातील गोष्टीचा जास्त विचार करत बसू नये. स्वतःला जर आनंदात राहायचे असेल तर मनसोक्त जीवन जगावे. जेणेकरून समाजासाठी सुद्धा ते उपयोगी व फलदायी असावे. पुढील जीवनात आपण काय होणार? याची अजिबात काळजी न करता,
आहे त्या परिस्थितीत जीवन सुरळीत पणे जगावे. स्वतःची काळजी स्वतः घेऊन जीवन जगावे. वयानुसार जीवन जगताना मनसोक्त आनंद घ्यावा.आपल्या मनासारखे सर्व भेटले की, आनंद उफाळून वर येतो. त्यासाठी परिश्रम सुद्धा महत्त्वाचे आहेत. म्हणूनच आज एक सुंदर असं गीत येथे देत आहोत. ते खरोखरच आपल्या जीवनात सामाजिक, अध्यात्मिक, शैक्षणिक बदल घडून आणणारं आहे.
मानवी जीवनात भरपूर आनंद आहे.तो आनंद जीवन जगते वेळेस आपणाला उपभोक्ता यावा.ही झाडे,वेली,पशु,पाखरे,निसर्ग, नदी,ओढे,नाले,प्राणी जीवन, हिमशिखरे,महासागरे, खळखळणारे झरे,वाहणारे ओढे, उडणारे फुलपाखरे, उंच उंच पर्वत, विद्यालय सुटल्यानंतर घराकडे आनंदाने धावणारी मुले यांच्याकडे पाहून आनंद घ्यायचा असतो. पंढरपूरला जाणारा वारकरी किती आनंदाने हातामध्ये भगवा झेंडा घेऊन राम कृष्ण हरी म्हणत ‘ज्ञानोबा तुकारामाचा’ गजर करीत जात असतो.
बालपण,तारुण्य या काळात आनंद मिळत असतो.त्यासाठी स्वच्छ चारित्र्य ठेवावी लागते.त्यासाठी पुढील ओळी वाचावे.
1) आनंद या जीवनाचा,
सुगंधा परी दरवळावा,
पाव्यातला सुर जैसा,
ओंठातून ओघळावा ||
जीवनात आनंद कसा घ्यायचा?
तो प्रत्येकांवर अवलंबून आहे.
आपलं जीवन असं जगावं की, आपल्या विचारांचा सुगंध सर्वत्र दरवळावा.आनंदाला भरती यावी.
असे आपले परिश्रम असावेत.
चहू बाजूला वाऱ्यांसोबत आपली कीर्ती जावी.तर आपलं जगणं या पृथ्वीतलावर उपयोगाचे ठरेल. दिसणारा व्यक्ती आपणांस प्रणाम करून पुढे जावावा.कोणताही व्यक्ती आपणांस टाळून बाजूला निघून जाऊ नये. सत्य वचन असावं.सर्वांशी प्रेमाने,आपुलकीने,बोलणं असावं.
कोणाशीही दंगामस्ती करून मनाला अवघड वाटेल. असे वागू नये. तर या जीवनाचा आनंद घेतल्याचा पुरेपूर मनसोक्त अनुभव घेता येईल.2) झिजूनी स्वतःचंदनाने,
दुसऱ्यांस मधुगंध द्यावा,
हे जाणता जीवनाचा,
प्रारंभ हा ओळखावा ||
जर तुम्ही चुकीचे वागलात.
तर तुमची निंदा-नालस्ती होईल.तुमचा आनंद जीवनातून निघून जाईल. तुम्ही जसं पेरालं,तसंच ते उगवते.चुकीच्या पद्धतीने चालल्यास शिक्षा होणारच?
म्हणून या जीवनामध्ये दूरचे जवळचे नातेवाईक,मित्रपरिवार,सवंगडी या सर्वांसोबत वागते वेळेस अतिशय नम्रपणे, प्रामाणिक पणे वागावे.3) संसार वेली वरी ही,
सुख दुःख फुलोनी फुलावे,
संदेश हा जीवनाचा,
दुःखी मनी हर्षवावा ||
आपल्या बरोबर इतरांनाही आनंद द्यावा.व आपणही आनंद साजरा करावा. तरच हे जीवन फार सुंदर आहे.छोटे मुलं फुलपाखराच्या पाठीमागे धावतात.तो आनंद अवर्णनीय असतो.म्हणून आनंद व्यक्त करते, वेळेस आपण किती मोठे आहोत. किंवा लहान आहोत.
याची जाणीव नसावी.विवाह समारंभात, हळद खेळताना,वाढदिवसाच्या निमित्ताने, आपलं वय विसरून नृत्याचाही आनंद घेतला जावावा.किंवा दीपवालीला दारूगोळा उडवून आनंद घ्यावा.
या जीवनात चूक झाली की, लोक ती चूक लक्षात ठेवतात.बाकीचे सर्व कार्य विसरून जातात.गुलाबाला काटे आहेत.परंतु गुलाबाचे फुल सुंदर आहे. याची जाणीव असू द्यावी.जो कष्ट,परिश्रम करतो,त्याला सर्व जग नमन : करते.आणि त्यांच्या जीवनात आनंद दरवळतो. या देशात अनेकांनी दुसऱ्याच्या आनंदासाठी आपलं संपूर्ण आयुष्य घालवले. स्वतः विचार केला नाही.आपण दुसऱ्याला किती आनंद देतो,आपण दुसऱ्यासाठी काय काय केलेलं आहे. त्याची यादी करा.तेव्हा तुम्हाला खऱ्या जीवनाचा आनंद मिळेल.4) जीवन जगता हसोनी,
सुख दुःख प्रतिसाद द्यावा,
हसता हसता परंतु,
गतकाळ ही आठवावा ||
मनुष्याने नेहमी गतकाळ आपल्या स्मरणा मध्ये ठेवावा.आपण किती गरीब होतो.परिश्रमातून आपण किती मोठे झालो, हे सर्व आपल्या अंत:करणाला माहीत असते.
देणाऱ्याने देत जावे,घेणाऱ्याने घेत जावे,घेता घेता देणाऱ्यांचे ,
हातच घ्यावे.. खरेच आपण कोणाला काही देतो का? सध्या मानवी वृत्ती भरकटली आहे.
पांढरे शुभ्र कपडे घातले,
म्हणजे मी फार मोठा ज्ञानी झाला.
असे अनेकांना वाटते.सध्या कोणाचा विश्वास कोणावर राहिला नाही. आपल्या जवळ पैसा आला म्हणजे आपल्याला आनंद मिळणार नाही. आनंद मिळण्या साठी अनाथांच्या,गोर गरिबांच्या,वृद्धांच्या दुःखात सहभागी व्हावे लागते. त्यांना आर्थिक मदत करावी लागते. जीव लावावा लागतो.जे का रंजले गांजले|
त्याशी म्हणे जो आपुले|
तोची साधू ओळखावा|
देव तेथेची जाणवा||
असे संत सज्जन मंडळींनी पूर्वी म्हटलेले आहे. तेथील खरा आनंद या जीवनात आहे.जीवनात शांततेने वागा.शांततेतून क्रांती करता येते. सर्वच गोष्टी हातात काठी घेऊन होत नाहीत.दोन्ही हात जोडून नमन: करून हजारो व्यक्तींना आपलंसं करून घेता येते.यात खरा जीवनाचा आनंद आहे.तथागत गौतम बुद्धांनी एक ही रक्ताचा थेंब न सांडता आपल्या शांतीतून जगात क्रांती केली.
यालाच खरा पुरुषार्थ म्हणतात.
त्यांच्या कार्याचा सुगंध आज संपूर्ण जगभर पसरला आहे. आपल्या चांगल्या कार्याची कीर्ती वाऱ्यासोबत सगळीकडे पसरते. तुम्ही नित्यनेमाने सेवा धर्म करत चला. कधीही तुम्हाला काही कमी पडणार नाही.
आपल्या देशातील अनेक साहित्यिक,कवी,समाज सुधारक,
क्रांतिकारक,शास्त्रज्ञ,संत,महंत,तंत यांच्या विचारांचा सुगंध दररोज दरवळतो.म्हणून या आनंदी जीवनात इतरांना त्रास देऊ नका.खोटे बोलू नका.दगा फटका करू नका. हे जीवन संघर्ष शील आहे.ते जगताना इतरांचाही विचार करा.मानवतावादी विचार सतत मनात ठेवा.हुकूमशाही कोणावर लादू नका. लोकशाही पद्धतीने चला.”लोकांनी लोकांसाठी,लोकांकरीता चालविलेले राज्य म्हणजे लोकशाही होय” याची जाणीव असू द्या.तेव्हा तुमचे जीवन
आनंदमय होईल.
भाकड,कथा,दंतकथा,अतिशोक्तीपर कथा अशा कथा वाचून तुमचं जीवन बदलणार नाही. त्यासाठी तुम्हाला परिश्रम करावे लागतील. सत्याच्या पाठीमागे रहा.तेव्हाच तुम्हाला लोक आपला गुरु,महात्मा,कर्मवीर,महर्षी, जननायक,महामानव,प्रज्ञावंत, यशवंत,कीर्तीवंत,कैवारी,जाणता राजा अशा अनेक उपाध्यांनी तुमची ख्याती गातील.त्यासाठी तुमचं बोलणे,चालने,वागणे,राहणे यात बदल पडता कामा नये.बोले तसे चाले |
त्याची वंदावी पाऊले ||
म्हणून आजच्या तरुणांनो सरळ मार्गाने चला,कुनीतीने वागू नका. दुसऱ्याचे वैभव पाहून चिडू नका. स्वतःच्या मनगटातून आपलं साम्राज्य तयार करा. स्वतःचे मन,मनगट,मेंदू यांच्यावर नियंत्रण ठेवा,एका विचारांच्या माणसांशी संगत सोबत करा.हे जग सुंदर आहे.या जगात आपल्या विचारांच्या माणसांची आपल्याला गरज आहे.त्यांच्याच बाजूने रहा.’खरा तो एकची धर्म’
या न्याया नुसार चला, आणि या जीवनाचा आनंद घ्या.जर तुम्हाला वाईट लोकांचे संगत लागली असेल, तर हे जीवन तुम्हाला नकोसे होईल. बाभळीच्या शेजारी केळीची बाग असेल तर केळीचे पाने एवढे सुंदर असून सुद्धा बाभळीच्या काट्याने फाटून जातात. म्हणून तुम्ही दरिद्री व्हाल,लोक तुम्हाला जवळ उभा राहू देणार नाहीत,संगत ही चांगल्याचीच असावी, दुर्जन, वाईट
,बेईमान,कंगाल,चोर, दरोडेखोर,
नक्षलवादी,लबाड,दोन तोंडी,बदमाश लोकांशी तुम्ही संगत केली तर तुम्हांला समाज वाईट समजणार.
दारूच्या दुकानातून जाऊन आल्यास समाज तुम्ही दारु पिणारे आहात. म्हणणारच? कारण तुम्ही अशा ठिकाणी गेलात की.ते ठिकाण समाजमान्य नाही. मग कसा तुम्हाला जीवनात आनंद निर्माण होईल.या गोष्टीचा अभ्यास करा.महिलां विषयी अपशब्द बोलू नका.त्यांना कधीही वाईट नजरेने पाहू नका.प्रत्येकांच्या घरी महिला आहेत.याची जाणीव ठेवा. जर आपले जीवन सुखी बनवायचे असेल तर परिश्रम तर करावेच लागतात.
याची जाणीव असू द्या. राजे-महाराजे मोठे झाले,कारण त्यांनी तेवढे शौर्य गाजवले. म्हणूनच आज आपण गुण्या गोविंदाने नांदत आहोत.त्यांच्या कीर्तीचा सुगंध सर्वत्र दरवळत आहे. म्हणून आनंद घ्यायचा असेल तर या जीवनाचा परिश्रम महत्त्वाचे आहेत. जीवन जगताना हसून जीवन जगावे .सुख दु:ख तर येणारच आहेत. सर्वांना प्रतिसाद देत चला, नेहमी पाठीमागचा गतकाळ ही आठवत चला. कारण गेलेला काळ अतिशय महत्त्वाचा असतो. त्यावरून पुढील जीवन जगायचं असते. म्हणून आपण येते वेळेस सोबत काही आणले नाही, जाते वेळेस काही घेऊन जाता येत नाही.म्हणून सर्वांशी प्रेमाने आपुलकीने वागून या जीवनाचा आनंद घ्यावा..समुपदेशक/मार्गदर्शक
प्रा.बरसमवाड विठ्ठल गणपत अध्यक्ष:विठू माऊली प्रतिष्ठान खैरकावाडी ता.मुखेड जि.नांदेड

