कंधार : प्रतिनिधी
श्री गुरु तेग बहादूर साहिब जी हिंद-दी-चादर”३५० वा शहीदी समागम निमित्य कंधार गटसाधन केंद्र येथे आयोजित तालुकास्तरीय गित गायन स्पर्धा दि.16 जानेवारी संपन्न झाली त्यात महात्मा फुले प्राथमिक शाळेचे वर्ग चौथीतील कु सायली वसंत आडे या विद्यार्थ्यांनी तालुक्यातून दुसरा क्रमांक मिळवला आहे.
या यशाबद्दल संत गाडगेबाबा शिक्षण संस्था कंधारचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डी. एन. केंद्रे साहेब,सचिव चेतन भाऊ केंद्रे साहेब,संचालिका तथा कंधार नगरपालिकेच्या माजी नगराध्यक्षा तथा विद्यमान नगरसेविका अनुराधा चेतन केंद्रे यांनी या विद्यार्थिनीचे कौतुक केले आहे व पुढील कार्यास शुभेच्छा दिल्या आहेत.
या स्पर्धेमध्ये भाग घेण्यासाठी महात्मा फुले प्राथमिक शाळेचे मुख्याध्यापक वाघमारे डी जी यांच्या मार्गदर्शनाखाली शिक्षक राजू केंद्रे,माणिक बोरकर,आगलावे आनंद, उषा कागणे, मेघा जाधव आदींनी परिश्रम घेतले.
#बालपणआणिशौर्य #श्रीगुरुतेगबहादूरसाहिबजी #हिंददीचादर #अमरबलिदान #शौर्याचीगाथा #GuruTeghBahadurJi #HindKiChadar

