——————————————–
वयाच्या ६ व्या वर्षी म्हणजेच ६ आक्टोबर १९८६ रोजी घटस्थापनेच्या दिवशीच आईचे छत्र मावळलेल्या पत्रकार धोंडीबा बोरगावे यांनी आपल्या लेखणीच्या माध्यमातून वेगवेगळ्या वर्तमानपञातुन सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत अनेकांना न्याय मिळवून देत जनमाणसात वेगळी ओळख निर्माण करतांना सबंध वाचकांच्या प्रेरणा मिळवत अखंड सेवा देणारे पत्रकार पत्रकार म्हणून आपली वेगळी ओळख निर्माण केली.
पत्रकारिते सोबतच सध्या जनसेवेसाठी ते राजमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत असतांना ग्रामीण भागात अनेक सामाजिक उपक्रम राबवत जनहीतांची कामे करत आहेत .
फुलवळ पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून सतत तिन वेळा पदभार सांभाळत आपल्या सर्व सहकारी पत्रकार बांधवाना सोबत घेऊन जिल्ह्यात ग्रामीण भागातील पहिले पत्रकार भवन फुलवळ सारख्या ग्रामीण भागात मंजूर करून घेतले .
अशा या लढवय्या पत्रकाराचा २ ऑक्टोबर हा जन्मदिवस होय. पुढील कार्याला शुभेच्छा देत माता तुळजाभवानी त्यांना बळ देवो हिच सदिच्छा.
धोंडीबा उर्फ बंडु बाबाराव बोरगावे
जन्म तारीख २ आक्टोबर १९७९
म्हणजेच येत्या २ आक्टोबर ला ४० वर्ष पुर्ण करून ४१ मध्ये पदार्पण करत आहेत. अगदी लहानपणी वयाच्या ६ व्या वर्षी म्हणजेच ६ आक्टोबर १९८६ रोज सोमवारी घटस्थापनेच्या दिवशीच एका क्रूर घटनेने त्यांच्यावरील आईचे छत्र कायमचे मावळले . तेंव्हा पासून त्यांनी अत्यंत कठीण परीस्थितीमध्ये वेगवेगळ्या समस्यांना तोंड देतB Sc पर्यंतचे शिक्षण पुर्ण केले.
१ डिसेंबर २००० रोजी पुण्यनगरी या वर्तमान पत्राच्या माध्यमातून पत्रकारीतेला प्रारंभ केला. २००० ते २००४ पुण्यनगरीचा प्रतिनिधी म्हणुन काम केले आणि २००४ ते २००७ या कालावधीत देशोन्नतीला वार्ताहर म्हणून काम केले . २००७ पासुन आज पर्यंत सकाळ या लोकप्रीय दैनिकामध्ये मध्ये बातमीदार म्हणून काम करत आहेत . आजपर्यंत अनेक सामाजिक प्रश्नांना वाचा फोडत अनेकांना न्याय मिळवून देत जनमाणसात आपली वेगळी ओळख निर्माण करतांना सबंध वाचकांच्या प्रेरणा घेत पञकारीतेला बळ दिले एवढेच नाही तर राजमाता बहुद्देशीय सेवाभावी संस्थेचे अध्यक्ष म्हणून काम करत असतांना अनेक सामाजिक उपक्रम राबवत जनहीतांची कामे केली .
नांदेड जिल्हात सर्व तालुक्यात कंधार तालुक्यातील फुलवळ माहित आहे.दरवर्षी पञकारीतेच्या माध्यमातून विविध सामाजीक उपक्रम राबवत चागंले काम करणाऱ्या अधिकारी ,शेतकरी व गुणवंताचा सत्कार करुन त्यांच्या पाठीवर शाब्बासकीची थाप मारुन कौतुक केले.जिल्हातील सर्व पञकारांना फुलवळ येथे बोलावून त्यांच्या सत्कार केला.परीणाम म्हणजे फुलवळची बातमी सर्व प्रथम लागणार व तेही सन्मानाने अशी ओळख बंडु उर्फ धोंडीबा बोरगावे यांनी आपल्या सोबती पञकारांच्या मदतीने केली.फुलवळ पत्रकार संघाचा अध्यक्ष म्हणून सतत तिन वेळा पदभार सांभाळत जिल्ह्यात ग्रामीण भागातील पहिले पत्रकार भवन फुलवळ सारख्या ग्रामीण भागात मंजूर करून घेतले .
धोंडीबा बोरगावे म्हणजे एक अजब रसायण च आहे. हो अजब रसायण या करीता म्हणतो की, लहाणपना पासुनच अनेक संकटांचा सामना करत संघर्षमय जीवन जगताना अगदी पाच ते सहा वर्षाचा असताना एका क्रूर घटना घडली आणि त्याच वेळी त्याच्या डोक्यावरचे आईचे छत्र हरवले, वडील अशिक्षित व घरची सामान्य परिस्थिती असताना ही ह्या माणसाला सामाजिक कार्याची वेगळीच ओढ.
कसेबसे पदवी पर्यंत शिक्षण घेवुन आपल्या करियर ला सुरुवात करत असताना अगदी कमी वयातच संसाराची जिम्मेदारी अंगावर पडली. तरी ही या माणसाच्या अंगातील सामाजिक कार्याची भावना , ओढ कमी झालीच नाही.
आमच्या भागात वेगवेगळ्या कल्पना , उपक्रम राबवुन आईच्या स्मरर्णार्थ योगा चे दर वर्षी शिबीर घेणे, राजमाता बहुद्देशीय सेवा भावी या सामाजिक संस्थेची स्थापना करुन संस्थे च्या माध्यमातुन वेगवेगळे उपक्रम राबवुन सुशिक्षित महीलांना स्वांवलंबी बनवण्यासाठी शिवणकला चालवणे, सकाळ च्या माध्यमातुन नदी पात्रातील गाळ काढणे, जवळ बसलेल्या युवकांना मोलाचा सल्ला देने.
एवढेच नाही तर आपल्या गावासाठी काही ना काही नवनवीन करता येते का हे आजही त्याच उमेदीने ते काम करतात. काही दिवसांपूर्वी कोरोना ची साथ असताना ही स्वतःच्या जीवाची पर्वा न करता फुलवळ परिसरात सापडलेल्या त्या चिमुकल्या बाळाचा जीव वाचवण्यासाठी केलेली धडपड , आणि त्या बाळाला वेळीच मिळवून दिलेला न्याय हे पण विसरता येत नाही.
हे सर्व करत असताना जन सामान्यांची वर्तमान पत्रांद्वारे व्यथा माडणारा पत्रकार म्हणुनही त्यांचा मोठा नाव लौकीक आहे व अनेकवेळा न्यायाप्रति अन्यायाविरुद्ध वाचा फोडण्यासाठी त्यांचा सिंहाचा वाटा आहे. यात तिळमात्र शंका नाही.
खरच ग्रामिण भागात राहुन कोणताही राजकीय वारसा नसताना. कोणतीही राजकीय भुक मनासी नसता , समाजा प्रती प्रांजळ काम करण्याची भावना असणारा हा आणि हाच माणुस असु शकतो. म्हणुनच मनावेशी वाटते की या माणसाला आजपर्यंत मिळालेले अनेक पुरस्कार हे अभिमानास्पदच आहेत.
आजपर्यंतच्या काळात त्यांच्या कार्याची दखल घेत सन्मानाचे पुरस्कार त्यांना मिळाले.
1) नवोदय बहुद्देशीय सेवाभावी संस्था कडून २०१२- १३ मध्ये उत्कृष्ट पत्रकारीतेचा पहिला पुरस्कार व
2) उदगीर तालूका पत्रकार संघाकडून देण्यात येणारा मराठवाडा स्तरीय उत्कृष्ट वार्ता प्रथम पुरस्कार २०१४- १५मध्ये मिळवत लेखणीची धार कायम ठेवत समाजमन जाणून घेत न्याय प्रविष्ठ बातम्या प्रकाशित करण्याची धडपड सुरूच ठेवली.
३) २०२० मध्ये कोरोना च्या महामारीत उल्लेखनीय कामगिरी बाजावल्याबद्दल भाजपा महाराष्ट्र महिला कार्यकारिणी कडून कोरोना योद्धा तर नांदेड मित्रमंडळ संस्था औरंगाबाद च्या वतीने कोरोनावीर या पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले.
वयाच्या ६ व्या वर्षी आईच्या मायेला मुकले पण परंतु तुमच्या , आमच्या सारख्या असंख्य वाचकप्रेमी व मित्रपरीवाराने भरभरून दिलेल्या प्रेमरूपी मायेतून लेखणीच्या च्या माध्यमातून अनेकांना न्याय मिळावा यासाठी सतत धडपड करत फुलवळ येथील नदीलाही सकाळ रिलीफ फंडाच्या माध्यमातून त्यांनी पुनर्जीवित करण्यासाठी जलयुक्त शिवारचे मोठे काम पुर्ण केले.अशा या लेखनीबहाद्दर पञकारांना उदंड आयुष्य लाभो. त्यांच्या लेखणीची धार अशीच तळपत राहो हीच सद्दीच्या….
शुभेच्छूक…
पत्रकार दिगांबर वाघमारे कंधार आणि
आनंदा पवार सामाजिक कार्यकर्ते फुलवळ.
ग्रेट भाऊ वाढदिवसानिमित्त ऍडव्हान्स मध्ये मध्ये शुभेच्छा,
तुमच्या विषयी बोलायचं म्हणलं तर खूप काही आहे
स्पर्धेच्या युगात तुम्ही उच्च शिक्षित असताना success च्या मागे न धवता बऱ्याच गोष्टी इतरांच्या हितासाठी करता ह्यात काही शंका नाही
Tum jio hajaro saal bhau
dear sir thanks