नरबळी : अंधश्रद्धा ही भारतीय समाजाला लागलेली कीड

उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील पिंपळगाव (डोळा) येथील ६ वर्षीय बालकाचा अंधश्रद्धेतून बळी देणाऱ्या आत्या चुलता-चुलतीसह ६ जणांना जिल्हा व सत्र न्या. एम. जी. देशपांडे यांनी शुक्रवारी जन्मठेपेची शिक्षा सुनावली आहे. आरोपींनी मयतांचे आत्मे भटकू नयेत, यासाठी अत्यंत निर्घृणपणे बालकाचा खून केला होता. विशेष म्हणजे मयत चिमुकल्याची सख्खी आत्या, चुलता, चुलती, आजोबा यांनी पुणे येथील मांत्रिकाच्या सांगण्यावरुन हे कृत्य केल्याचे उघड झाले आहे.

पिंपळगाव येथील कृष्णा गोरोबा इंगोले हा २६ जानेवारी २०१७ रोजी शाळेतून झेंडावदंन करुन घरी आल्यानंतर अंगणात खेळत असताना गायब झाला होता. प्रजासत्ताक दिनाचा कार्यक्रम संपवून त्यांचे पिंपळगाव (डो) येथील वस्तीवरील घरी दुपारी बारा वाजता आला. घरी आई नसल्याने त्याची आई तो घराबाहेर खेळत होता. मात्र नंतर तो अचानक गायब झाला. दिवसभर शोधूनही तो मिळुन आला नसल्याने शेवटी २६ जानेवारी २०१७ रोजी मयत कृष्णाची आई सारीका इंगोले यांनी मुलगा यास अज्ञात इसमाने अज्ञात कारणासाठी पळवुन नेल्याची तक्रार दिली होती. दुसऱ्याच दिवशी म्हणजे २७ जानेवारी २०१७ रोजी सकाळी अकराच्या सुमारास शेतामध्ये कृष्णाचा मृतदेह सापडला होता.

पोलीस तपासामध्ये कृष्णाची सख्खी आत्या द्रौपदी पौळ हिने त्याला घरामागील दाट झाडीत बांधून मध्यरात्रीच्या सुमारास अघोरी पूजा करुन बळी दिला. आधी त्याला बोलावून घेतल्याचे समोर आले. नंतर आरोपी उत्तम इंगोले यांच्या घराच्या मागील सामाईक विहीरीवर दाट झाडीत घेऊन गेली. त्याच ठिकाणी आरोपी द्रोपदी हिने इतर आरोपीच्या मदतीने कृष्णाचा खून करुन नरबळी दिल्याचे उघड झाले.
द्रौपदी पौळ, उत्तम इंगोले, उर्मिला इंगोले, साहेबराव इंगोले, सुवर्णा भाडळे, राहूल चुडावकर अशी शिक्षा झालेल्यांची नावे आहेत.

आरोपी उत्तम इंगोले याची चुलत बहीण व साहेबराव इंगोले याच्या मयत पत्नीचा आत्मा भटकू नये, तसेच आरोपी द्रौपदी पौळ हिच्या दोन मुलींच्या पतीचा मृत्यू झाला आहे. आरोपीच्या घरात शांतता नव्हती, आरोपी द्रोपदी हिच्या मुलीचे दोन पती मयत झाले होते. एका मुलीची मुले जगत नव्हते, मयत कडुबाईचा व साहेबरावच्या पत्नीचा आत्मा भटकत असल्याने हे सर्व होत आहे. त्यासाठी रक्ताच्या नात्यातील मुलाचा नरबळी द्यावा लागेल असे पुणे येथील मांत्रीक आरोपी राहुल उर्फ लखन चुडावकर व सुवर्णा भाडके यांनी व इतर आरोपींनी सल्ला दिला होता.‌ घटनेच्या आधीपासुन आरोपी उत्तम व पत्नी उर्मीला हे सर्व कुटुंबासह पुणे वास्तव्यास होते. त्या ठिकाणी मांत्रीक आरोपीची ओळख झाली होती. आरोपीच्या एका मुलीची लेकरे जगत नव्हती, यातून सुटका होण्यासाठी मांत्रिक राहूल चुडावकर व सुवर्णा भाडळे यांच्या सल्ल्याने बळी देण्यात आला, असे कारण देण्यात आले आहे.

सर्व आरोपी पिंपळगाव येथे अमावस्या, पोर्णीमेला पूजा करण्यासाठी येत असत. घटनेच्या अगोदर पंधरा दिवसांपूर्वी पिंपळगाव येथे येऊन आरोपीनी कट कारस्थान करुन कृष्णा याचा नरबळी देण्याची योजना बनविली. त्यासाठी त्यानी आरोपी उत्तमच्या घराशेजारी खड्डा खोदून त्याठिकाणी मयत कडुबाईची समाधी बांधण्याचा मनोदय व्यक्त केला.

या प्रकरणात आरोपी व मयत यांना एकत्र पाहणारा साक्षीदार, वैद्यकीय अधिकारी, आरोपीच्या मोबाईलचे रेकॉर्डींग व टॉवर लोकेशन, कराड येथील मुर्तीकार, समाधीचे बांधकाम घेणारा गुत्तेदार, आरोपी लखनचा मित्र यांची साक्ष महत्वुपुर्ण ठरले. या प्रकरणातील काही महत्वाचे साक्षीदार फितुर झालेले होते. गुन्हा पाहणारा कोणीही प्रत्यक्षदर्शी साक्षीदार तपासात निष्पन्न झाला नव्हता. मात्र कृष्णाच्या मृत्युपुर्वी व मृत्युनंतर घडलेल्या छोट्या छोट्या घटनाची साखळी परिस्थिती जन्य पुरावा पुर्ण करण्यात सरकारी पक्षाला यश आले. अतिरिक्त शासकीय अभियोक्ता अॅड. सचिन सुर्यवंशी यांचा युक्तीवाद न्यायालयाने ग्राह्य धरुन आरोपीना जन्मठेपेची शिक्षा सुनावली.

गावात आई-वडिलांसोबत शेतात राहणाऱ्या ६ वर्षांच्या कृष्णा इंगोले या मुलाला डोक्यात लाकडी रुमण्याने जबर मारहाण करून खून केल्याचे समोर आले होते. आई सारिका यांच्या तक्रारीवरून २७ जानेवारी २०१७ रोजी कळंब पोलिसांत खुनाचा गुन्हा नोंद झाला. पोलिसांनी ४ ते १० फेब्रुवारी २०१७ दरम्यान भोंदूबाबा लखन चुडावकर, उत्तम इंगोले, ऊर्मिला इंगोले, सुवर्णा भाडके, द्रौपदाबाई ऊर्फ लक्ष्मी पौळ व साहेबराव प्रल्हाद इंगळे यांना ताब्यात घेतले. पोलिसी खाक्या दाखवताच १३ एप्रिल २०१७ रोजी द्रौपदीने नरबळी दिल्याचा जवाब दिला.

आराेपी व मुलाला एकत्र पाहिले हाेते : या खटल्यातील एका साक्षीदाराने आरोपी व मृताला यांना एकत्र पाहिले हाेते. त्यामुळे त्याची साक्ष या प्रकरणात अत्यंत महत्त्वपूर्ण ठरली. तसेच वैद्यकीय अधिकारी, आरोपीच्या मोबाइलचे रेकॉर्डिंग व टॉवर लोकेशन, कराड येथील मूर्तिकार, समाधीचे बांधकाम घेणारा गुत्तेदार, आरोपी लखनचा मित्र यांचीही साक्ष महत्त्वपूर्ण ठरली. कृष्णाच्या मृत्यूपूर्वी व मृत्यूनंतर घडलेल्या छोट्या छोट्या घटनांची साखळी हीच परिस्थितीजन्य पुरावा म्हणून मांडण्यात सरकारी पक्षाला यश आले.

यवतमाळमध्ये गुप्तधनासाठी नरबळी देण्याचा डाव २०१२ मध्ये गावकऱ्यांनी उधळून लावला होता. त्याप्रकरणी चार आरोपींना पोलिसांनी अटक करण्यात आली. मुख्य म्हणजे सामाजिक न्यायमंत्री शिवाजीराव मोघेंच्या मतदारसंघातच अंधश्रद्धेतून नरबळी देण्याचा प्रयत्न झाल्यानं खळबळ उडाली.

यवतमाळमधल्या घाटंजी तालुक्यातल्या मुरली इथल्या मारुती मंदिर परिसरात रात्रीच्या अंधारात एका बालिकेचा नरबळी देण्याचा प्रयत्न सुरू होता. गावकऱ्यांनी रडण्याचा आवाज ऐकल्यामुळे नरबळी देण्याचा डाव उधळला गेला. त्यावेळी गावक-यांनी दोघांना पकडलं मात्र इतर तिघं बालिकेला घेऊन पसार झाले. या प्रकरणाची तक्रार केल्यानंतर पोलिसांनी थातुरमातुर चौकशी केली आणि आरोपींना सोडून दिलं.

मात्र याच परिसरातील सात वर्षांची मुलगी बेपत्ता आहे. आणि तिलाच नरबळीसाठी पळवल्याची तक्रार तिच्या नातेवाईकांनी केलीए. त्यानंतर पोलिसांनी आरोपींना पुन्हा अटक करून त्यांच्यावर अपहरणाचा गुन्हा दाखल केला. मात्र या प्रकरणाचा तपास थांबवल्यामुळे गावकऱ्यांमधून रोष व्यक्त होत होता. नरबळीचा प्रयत्न करणाऱ्यांनी मंदिर परिसरात एक खोदलेला खड्डा आणि पूजेचं साहित्य सापडलं होतं.

त्याचवेळी आरोपींची चौकशी झाली असती तर मुलगी मिळाली असती असं गावकरी म्हणताएत. आता या प्रकरणाची सीआयडी चौकशी करण्याची मागणी गावक-यांनी केलीए. तर नरबळीची ही घटना दुर्भाग्यपूर्ण असून जादूटोणा विरोधी विधेयक मंजूर झालं पाहिजे असल्याची प्रतिक्रिया मतदारसंघाचे लोकप्रतिनिधी शिवाजीराव मोघेंनी दिली होती.

यवतमाळ जिल्ह्यातच २०१३ मध्ये एक घटना घडली होती. सात महिन्यापासून बेपत्ता सपना पळसकर या सात वर्षीय बालिकेचा गळा चिरून नरबळी देण्यात आल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यातील ८ आरोपींनी दिली आहे. पुरोगामी असल्याचा टेंभा मिरविणाऱ्या महाराष्ट्रात व राज्याचे सामाजिक न्याय मंत्री शिवाजीराव मोघे यांच्याच मतदारसंघात नरपशूनि क्रौर्याची सीमा गाठली, आणि समाज मन सुन्न झाले.

यवतमाळ जिल्ह्यातील चोरंबा येथील सात वर्षीय स‌पना पळसकर हिचे आईवडील सपनाच्या काळजीने त्रस्त होते.

ती दसऱ्यापासून बेपत्ता होती. अखेर तिची कवटीच सापडली. तिचा खून झाला होता. तिचा नरबळी दिला होता. या घटनेने श्रद्धा-अंधश्रद्धेचा मुद्दा पुन्हा ऐरणीवर आला. देवांना प्रसन्न करण्यासाठी जनावरांचा बळी देऊ नये, असा आवाहनाचा आवाज मोठा होऊ पाहत असतानाच सपना गेली. हकनाकच गेली.

घाटंजी तालुक्यातील या चोरंबा गावात नवरात्राचा उत्साह होता. कधी नव्हे ती गावात पहिल्यांदा देवीची प्रतिष्ठापना करण्यात आली होती. नेमक्या याच धामधुमीत सपना बेपत्ता झाली. कशी ते तेव्हा कळलेच नाही. ती बेपत्ता झाली त्यावेळी गावात वीज नव्हती. दिवस महिलांवरील अत्याचाराच्या वाढत्या घटनांचे होते. त्यामुळे तर्क-वितर्क लावले जात होते. दसरा झाला. दिवाळी आटोपली. नवे वर्ष आले. तेही जुने झाले. सपना कुठेच सापडली नाही.

आईवडील मुलीची आठवण काढत एकेक दिवस ढकलत होते. पोलिसांकडे पाठपुरावा करीत होते. इतके दिवस झाले तरी पोलिसांकडून पोरीचा पत्ता लागला नाही म्हणून निराश झालेल्या आईवडिलांनी आत्महत्या करण्याचा इशारा दिला. तोपर्यंत सामाजिक संस्थांनी हा विषय लावून धरला होता. निदर्शनेही झाली. पोलिसांनी प्रकरण गांभीर्याने घेतले. पथके इकडे तिकडे जाऊ लागली. तिला कुणी पळवून विकले तर नाही, या भीतीने एक पथक अगदी राजस्थानपर्यंत गेले. हाती निराशाच आली.

अखेरीस २० मे रोजी सपनाची कवटी आणि हाडे आढळली. तिच्या अंगावरील कपड्यांच्या चिंध्या झाल्या होत्या. चिंध्यांनी ही दुर्दैवी सपनाच असल्याचे सांगितले. पोलिस तिच्या मृत्यूच्या कारणाचा शोध घेऊ लागले. या शोधातून चार दिवसांतच नरबळीचे वास्तव पुढे आले. पाच आरोपींना अटक झाली. तिच्या आईसाठी तर हा धक्काच होता. काळजाच्या तुकड्याचा निर्घृण खून करणारा तिचा सख्खा भाऊ आणि बाप होता. सपना सापडावी यासाठी झालेल्या आंदोलनात हिरीरीने सहभागी होणारेही हेच होते आणि शांत चित्ताने सपनाच्या गळ्यावर सुरी फिरविणारे, तिचे रक्त प्राशन करणारेही हेच होते.

रक्त प्राशन करण्याच्या मानसिकतेला काय म्हणावे? विकृती की राक्षसीवृत्ती? आरोपींचे देवदेव अजूनही संपलेले नाही. अटकेतून देवीच सुटका करेल, असा त्यांना दृढ विश्वास आहे. खुद्द त्यांनी पोलिसांसमोर हे बोलून दाखविले. सपनाला मारणारी तिच्या आजोबांची बहीण यशोदा मेश्राम हिला तिच्या या कृत्याबद्दल कोणताही पश्चाताप नाही. ‘आम्ही देवाचेच काम केले आहे. त्यामुळे घाबरण्याचे कारणच नाही’, असे ती सांगते आहे.

कोलाम पोडाच्या सुख शांतीसाठी रक्ताचे नाते असलेल्या सपना च्या रक्ताचा घोट घेवून देवीला प्रसन्न केले अशी अंधश्रद्धा असल्याने त्या रक्तपिपासुंच्या चेहऱ्यावर अपराधीपणाची कुठलीही लकेर दिसत नाही. गेल्या सात महिन्यांपासून बेपत्ता असलेल्या सपना पळसकर या बालिकेचा गळा चिरून नरबळी देण्यात आल्याची कबुली पोलिसांच्या ताब्यातल्या आरोपींनी दिली होती. विशेष म्हणजे मुलगी बेपत्ता झाल्यानंतर मुलीच्या आईवडलांनी पोलीसांकडे नरबळीचा संशय व्यक्त केला होता मात्र पोलिसांनी त्यांच्याकडे दुर्लक्ष केल होतं. त्यानंतर सामाजिक संघटनांनी केलेल्या आंदोलनानंतर पोलीसांनी या प्रकरणाचा तपास केला त्यामधून ही माहिती पुढे आली.

सपनाच्या शोधासाठी आंदोलन करणारे तिचे नातलगच मारेकरी असल्याचं पोलीस तपासात पुढे आलं होतं. सपना च्या आईची आत्या. आजोबा, मामा व कोलाम पोडातील तिच्या आप्तेष्टांनी तिच्या गळ्यावर सुरा फिरवून तिचा बळी दिला. अशी माहिती या तपासांत पुढे आली.

त्र्यंबकेश्वर तालुक्यातल्या पाचकुंडल्याची वाडी या गावात २०१८ साली नरबळीचा प्रकार झाल्याच्या संशयावरून खळबळ उडाली होती. चार महिन्यांच्या एका मुलीचं अज्ञात लोकांनी अपहरण करून नंतर तिला जवळच्याच जंगलात सोडून दिलं होतं. ही लहान मुलगी सापडली तेव्हा तिच्या जवळ हळद-कुंकू आणि इतर पूजा साहित्य सापडल्यानं नरबळी देण्याच्या उद्देशानं तिचं अपहरण झालं होतं असा संशय बळावला आहे. मुलगी बेशुद्धावस्थेत सापडली होती. तिला उपजिल्हा रुग्णालयात उपचार करून पुन्हा पालकांकडे सोपवण्यात आलं.

खोपोली (रायगड) शिळफाटा परिसरातील आडवाटेच्या झुडुपात पोलिसांना चार वर्षांच्या चिमुरडीचा मृतदेह आढळून आला. या चिमुरडीचा अतिशय निर्घृणपणे खून करण्यात आला आहे. मंगळवार १२ फेब्रुवारी २०१८ पासून ही चिमुरडी बेपत्ता होती.

सकाळी ७ वाजण्याच्या सुमारास पोलिसांना शिळफाटा परिसरातील पटेल नगर येथील आडवाटेच्या झुडुपात या चिमुरडीच्या मृतदेहाचे दोन तुकडे आढळून आले. चिमुरडीचे धड आणि शीर वेगवेगळे करून झाडीत वेगवेगळया ठिकाणी फेकण्‍यात आले होते. चिमुरडीच्या शरीरावर चटके दिल्याच्या अनेक खुणा पोलिसांना आढळून आल्या. यावरुन तिचा नरबळी देण्यात आला असावा असा अंदाज पोलिसांनी वर्तवला आहे. तसेच तिची अवस्था बघून तिच्यावर बलात्कार झाल्याचाही संशय पोलिसांना आहे.

चिमुरडीचा मृत्यू झाल्याने परिसरात शोककळा पसरली आहे. चिमुरडीचे वडील ट्रॅक्टर चालक आहेत, तसेच ते मोल-मजुरीही करतात. हे कुटुंब मूळचं उत्तर प्रदेश येथील आहे. मंगळवारी सकाळपासून ही चिमुरडी बेपत्ता होती. तिच्या घरच्यांनी तिचा शोधही घेतला, मात्र तिचा कुठेही पत्ता लागला नाही. आज तिच्या मृत्यूची माहिती मिळाल्याने कुटुंबीयांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे.

या घटनेची माहिती मिळताच तात्काळ उपविभागीय पोलीस अधिकारी रणजित पाटील यांच्यासह इतर अधिकाऱ्यांनी घटनास्थळ गाठलं. पेलिसांनी या चिमुरडीचा मृतदेह ताब्यात घेतला असून शवविच्छेदनानंतरच हा प्रकार नरबळीचा आहे की तिचा बलात्कार झाला आहे, हे स्पष्ट होईल. चिमुरडीचा खून कुणी आणि का केला आसावा याबाबत पोलिसांनी तपगुप्तधनासाठी चिमुकल्याचे बळी देण्याचा प्रयत्न फुलंब्री तालुक्यातील रांजणगाव येथे करण्यात आला. या मुलीचे नशीब बलवत्तर असल्याने अंधश्रघ्दा निर्मुलन समितीचे कार्यकर्ते आणि वडोदबाजार पोलिसांनी वेळीच छापा ठाकल्यानें तिचा जीव वाचला.

हा प्रकार तीन दिवसांपासुन सुरु होता. मात्र गावात कोणालाही या ‍विषयीची कुणकुणही नव्हती. रांजणगाव येथील बाळु गाणपत शिंदे जालना येथील बाळु गाणपत शिंदे व इमाम पठाण हे पूजा करुन नरबळी देऊन गुप्तधन काढण्याचा तयारीत होते. इमाम पठाण याच्याकडे नरबळीसाठी मुलगी आणण्याची जबाबदीरी सोपविण्यात आली होती. आज बाळु शिंदे आणि दिगंबर जाधव हे पुजेचे साहित्य आणण्यासाठी फुलंब्री येथे जात असतांना अंधश्रध्दा निमुलन समितीचे राज्य सरचिटणीस शहाजी भोसलेंसह त्यांचा सहकारी व फुलंब्री पोलिसांनी त्यांना डोंगरगाव येथे अडविले. या दोघांची रांजणगाव येथे घटनास्थळी नेऊन चौकाशी केली असता घरात खोदलेला खडडा, नारळ पुजेसाठी केलेली आकर्षक मांडणी व देवीची मुर्ती आढळुन आले. यानंतर हा सर्व प्रकार उघडकीस आला. घटनास्थळावरुन मुख्य आरोपी बाळु शिंदे, इमाम पठाण यांना व त्यांच्या घरी हा प्रकार केला जात होता तो दिगंबर जाधव यास पोलिसांनी ताब्यात घेतले.

राज्यभरात खळबळी उडवणाऱ्या इगतपुरी (नाशिक) तालुक्यातील टाके हर्ष नरबळी प्रकरणी नाशिक कोर्टाने शिक्षा सुनावली आहे. आई आणि सासूचा नरबळी देणाऱ्या ११ आरोपींना कोर्टाने जन्मठेपेची शिक्षा ठोठावली आहे. आरोपींमध्ये मयत महिलेच्या दोन मुलांचा समावेश आहे. तसेच, महाराष्ट्र नरबळी व इतर अमानुष, अनिष्ट अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंधक कायदा- २०१३ अन्वये देण्यात आलेली राज्यातील ही पहिलीच शिक्षा आहे.

मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील इगतपुरी तालुक्यातील टाके हर्ष या आदिवासी गावात ऑक्टोबर २०१४ मध्ये हा धक्कादायक प्रकार घडला होता. बुगीबाई पुनाजी दोरे व तिची बहीण काशीबाई भिका वीर या दोघींचा नरबळी देण्यात आला होता. घरातील वृद्ध महिलांमुळेच सुख समाधान मिळत नाही, पैसा टिकत नाही, असा समज एका मांत्रिकाने या दोन्ही मृत मुलांचा समज केला होता. त्यामुळे या दोघांनी पैशाच्या लोभापायी नरबळी दिला होता. विशेष म्हणजे यानंतर या दोघींचे मृतदेह डहाळेवाडी येथील एका शेतात पुरण्यात आले होते. या प्रकरणी घोटी पोलीस ठाण्यात महाराष्ट्र जादूटोणा कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला होता.

जिल्हा व सत्र न्यायाधीश नंदेश्वर यांनी न्यायालयासमोर आलेल्या पुुराव्यानुसार आरोपी बच्चीबाई खडके, बुग्गी वीर, लक्ष्मण निरगुडे, नारायण खडके, वामन निरगुडे, किसन निरगुडे, गोविंद मोरे, काशीनाथ दोरे, महादू वीर, हरी निरगुडे, सनीबाई निरगुडे (रा़ टाके हर्ष, ता़ इगतपुरी, जि़ नाशिक) या अकरा आरोपींना जन्मठेपेची शिक्षा सुनावली़ आहे.

आंधळेपणाने एखादी गोष्ट स्वीकारणे यास अंधश्रद्धा असे म्हणतात. अंधश्रद्धेमध्ये विविध प्रकार आहेत. यामध्ये काळी जादू, तंत्र-मंत्र, जादूटोणा, नरबळी ,नजर टोक, तसेच भूत- प्रेत, पिशाच्च या संबंधित अंधविश्वास, अफवा पसरवणे व कृती करणे तसेच या कृतींचाही इतर प्राणी जीवनावर विपरीत परिणाम होणे म्हणजेच .

व्हॅटिकनमध्ये ‘एक्सॉरसिजम’ नावाचा भूत उतरवण्याचा कोर्स शिकवला जातो. इ.स. २००५ साली सर्वप्रथम हा कोर्स सुरू करण्यात आला होता.

समाजातील अज्ञानाचा फायदा घेवून विघातक वृत्तीकडून होणारे शोषण थांबविण्यासाठी महाराष्ट्राने २०१३ साली कठोर कायदा केला आहे. याचे संक्षिप्त नाव महाराष्ट्र नरबळी आणि इतर अमानुष, अनिष्ट व अघोरी प्रथा व जादूटोणा प्रतिबंध कायदा, २०१३ असे आहे. अंधश्रद्धा निर्मूलन समितीचे संस्थापक नरेंद्र दाभोलकर, शाम मानव अशा सामाजिक कार्यकर्त्यांनी केलेल्या पाठपुराव्यामुळे शासनाला हा कायदा करावा लागला. तरीही हे प्रकार चालू असणं हे पुरोगामी महाराष्ट्राला शोभत नाही. इथे जनजागृतीची मोठ्या प्रमाणावर गरज असून अंधश्रद्धेच्या समूळ उच्चाटनाशिवाय भारताचा खरा विकास शक्य नाही.

गंगाधर ढवळे ,नांदेड

संपादकीय/
३०.१०.२०२०

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *