*कंधार प्रतिनीधी – संतोष कांबळे*
युरिया खताच्या खरेदीसाठी शेतकर्यांना इतर औषधांची सक्ती करुन कृषी सेवा संचालकाकडून शेतकऱ्यांची लूट केली जात असल्याची बाब समोर आली असून कृषी अधिकारी याकडे डोळे बंद करून आंधळ्याची सोंग घेऊन बसले आहे.
युरीया खताची खरेदी करताना कंधार येथील कृषी सेवा केंद्र आणि खाजगी दुकानदार युरीया खत हवे असल्यास जाणिवपूर्वक इतर आवश्यक नसलेल्या औषधांची खरेदीची सक्ती शेतकर्यांवर करीत आहेत. जर इतर औषधी खरेदी करत नसल्यास उपलब्ध असलेल्या युरिया उपलब्ध नाही असे सांगून शेतकर्यांची अडवणूक करत असल्याचा प्रकार तालुक्यातील कृषी सेवा संचालकाकडून होत असल्याचे दिसून येत आहे.
या घटनेची प्रशासनाने गंभीर दखल घेवून शेतकर्यांवर होणाऱ्या औषधांची सक्ती तातडीने थांबवावी अशी मागणीचे निवेदन तहसीलदार आणि कृषी अधिकारी यांना इंडीयन आर्मी चे मेजर शिवहार सुदाम कागणे यांनी दिले असून. या गंभीर बाबीवर तत्काळ कार्यवाही करावी अन्यथा उपोषणाचा इशारा देण्यात आला आहे.
आज रोजी तालुक्यातील शेतकऱ्यांचा डोळ्यादेखत होत असलेला छळ अक्षरशः मुघल, इंग्रज शासकापेक्षाही क्रूर आहे, एकंदरीत कृषी सेवा संचालकाकडून जाणिवपूर्वक ही परिस्थिती निर्माण करून कोट्यवधीची रक्कम अवैध पद्धतीने शेतकऱ्यांकडून लुटण्याचा घाट घातला आहे.
कृषि सेवा केंद्र कंधार येथील कृषि सेवा केंद्रावर युरिया खताबरोबर टॉनीक औषध कंपलसरी देत आहेत, जर औषध नाही, घेतले तर, युरिया खत देत नाहित, दिला तर विशिष्ट माणसे पाहुण खत विक्री करत आहेत. या विषयावर गांभीर्याने दखल घ्यावी. व शेतकऱ्यांना दिलासा द्यावा असेही त्यांनी निवेदनात उल्लेख केला आहे.
शेतकऱ्याच्या मालला योग्य भाव मिळत नाही
तसेच त्यांच्याकडे एक खताचे पोते खरेदी करण्यासाठी पैसे नसतात त्यासाठी त्याला कर्ज घ्यावे लागते अनावश्यक टॉनिकचे औषधी कंपल्सरी केल्यामुळे तो आर्थिक अडचणीमध्ये सापडत आहे. यामुळे शेतकरी चिंताजनक झाला असून हे असेच चालत राहिल्यास शेतकऱ्याला आत्महत्या केल्याशिवाय पर्याय राहत नाही.
या विषयाचे गांभीर्य लक्षात घेऊन तहसीलदार साहेब आणि कृषी अधिकारी यांनी योग्य तो तोडगा काढावा.जर यावर तोडगा नाही निघाला, तर मी अमरण उपोषणास बसणार असून जर यामुळे मला ड्यूटी वर जाण्यास विलंब झाला किंवा माझ्या डिपार्टमेंटने जाब विचारला तर याला प्रशासन जबाबदार राहील असे निवेदनात नमूद केले आहे .
चौकट
कंधार शहरातील कृषी दुकान दाराकडुन परत जणतेची आर्थिक लुट होत आहे…आज प्रत्यक्ष आमचे सेवारत सैनिक शिवहार कागणे यांनी तहसीलदार आणि कृषी अधीकारी यांची भेट घेऊन लेखी निवेदन दिले. दुकानदार बांधवांनो आम्हाला मजबुर करू नका आता जर आम्ही स्टिंग ऑपरेशन सुरू केले तर आपल्याला आपला परवाना गमवावा लागेल. नंतर म्हणु नका की माजी सैनिक संघटना आम्हाला त्रास देत आहे.कृषी अधीकारी साहेब जास्त पुळका करू नका स्वतः च्या खळगी साठी.जणतेची आर्थिक लुट माजी सैनिक संघटना सहन करु शकत नाही. यावर कारवाई नाही झाले तर.माजी सैनिक संघटना शांत बसणार नाही आणि तुम्हाला पण शांत बसु देणार नाही .
– बालाजी चुकलवाड ( माजी सैनिक संघटना जिल्हाध्यक्ष )