धर्मापुरी ( प्रा भगवान आमलापुरे )
जय भगवान सेवाभावी संस्था संचलित कै शं गु ग्रामीण महाविद्यालयाचे शैक्षणिक वर्ष 2023 – 24 हे रौप्य महोत्सवी वर्ष आहे. हा कालावधी तसा थोडाफार नाही आहे. हा डोंगर पट्टा दोन्ही दृष्टीने उघडा – बोडका होता. एक म्हणजे शब्दाशाच परिसर माळरानाचा आहे. दोन म्हणजे उच्च शिक्षण देणारी एखादी संस्था या परिसरात नव्हती. अक्षरशः ध्येयवेडे होऊन संचालक मंडळाने अगदी भगिरथ प्रयत्न करुन उच्च शिक्षणाची ज्ञानगंगा या येथे धर्मापुरीत आणली आहे.
गतवर्षी धर्मापुरीतील प्राजक्ता मा फड ही आमच्या महाविद्यालयाची माजी विद्यार्थीनी पी एस आय झाली. तशी ही पोस्ट आपण समजतो आणि आकर्षित होतो तेवढी आणि फार मोठी निश्चितच नाही आहे. पण त्या पदाला ग्लॅमर होते, आजही आहे आणि कायम राहणार आहे. हे पद मिळवणं ही एक क्रेझ होती, आहे आणि राहणार आहे. यात वाद नाही आहे. हे फक्त एक प्रातिनिधिक उदाहरण होय.
अगदी असेच, महाविद्यालयाच्या प्रांगणात रासेयो विभागाने वेळोवेळी वृक्षारोपण केले आहे. ते व्रक्ष गत काही वर्षांपासून फुलली आणि फळली आहेत. यावर्षी पहिल्यांदाच फुललेल्या आणि फळलेल्या रोपट्यासोबत आज दि 29 नोव्हें 24 रोजी प्रा भगवान कि आमलापुरे यांनी टिपलेले टी डी सर , अविनाश सु मुंडे आणि करण ना फड यांची एक भावमुद्रा.