प्रहार च्या कंधार तालुकाध्यक्षपदी नवनाथ वाखरडकर यांची निवड

कंधार-
प्रहार जनशक्ती पक्षाच्या कंधार तालुकाध्यक्षपदी धडाडीचे युवा कार्यकर्ते नवनाथ भाऊ वाखरडकर यांची नियुक्ती जिल्हाध्यक्ष विठ्ठलराव देशमुख यांनी केली आहे.


माळाकोळी येथे पार पडलेल्या प्रहार जनशक्ती पक्षाच्या विशेष बैठकीत सदरील नियुक्ती जाहीर करण्यात येऊन त्यांना नियुक्तीचे पत्र देण्यात येऊन त्यांचा मान्यवरांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.यावेळी प्रहार जनशक्ती पक्षाचे जिल्हा उपाध्यक्ष उद्धव भोसले,नांदेड शहराध्यक्ष प्रीतपाल सिंह शाहू,कंधार-लोहा विधानसभा अध्यक्ष माधव पेटकर,प्रहार चे डॅशिंग लोहा तालुकाध्यक्ष माऊली गित्ते,गोविंद वडजे, दिव्यांग चे लोहा तालुकाध्यक्ष चांद भाई, लोहा शहराध्यक्ष गजानन गित्ते यांच्यासह बहुसंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *