डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा विटंबना प्रकरणी एकास अटकमाळेगाव येथे तणावपूर्ण शांतता.
माळाकोळी ; एकनाथ तिडके
दक्षिण भारतातील प्रसिद्ध असलेल्या माळेगाव यात्रा येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची रात्रीच्या सुमारास विटंबना झाली असून ही बाब लक्षात आल्यानंतर माळेगाव येथे मोठ्या प्रमाणावर आंबेडकर प्रेमी जनतेने गर्दी केली होती ,पोलिस प्रशासनाने तातडीने यासंदर्भात हालचाली करत एकास ताब्यात घेतले आहे यानंतर प्रशासनाने उपस्थित जमावाला शांततेचे आवाहन करत योग्य कार्यवाही करण्याचे आश्वासन दिले.
माळेगाव ता. लोहा येथील मुख्य रस्त्यालगत असलेल्या डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळ्याची विटंबना रात्रीच्या सुमारास घडली असावी ही बाब सकाळी आठच्या सुमारास गावातील नागरिकांच्या निदर्शनास आली यावेळी माळेगाव येथील पुतळा परिसरात मोठ्या प्रमाणावर नागरिकांनी गर्दी केली होती. घोषणाबाजी करत आरोपींना तातडीने अटक करण्याची मागणी जमावाकडून होत होती , यावेळी अतिरिक्त पोलीस अधीक्षक दत्ता राठोड उपविभागीय अधिकारी पी एस बोरगावकर ,तहसीलदार विठ्ठल परळीकर ,उपविभागीय पोलिस अधिकारी श्री कांबळे स्थानिक गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक श्री चिखलीकर माळाकोळी पोलीस स्टेशनचे सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री घाटे , पोलीस उपनिरीक्षक श्रीमती उमाप , पोलीस कॉ अशोक फड तलाठी श्री कल्याणी तलाठी श्री फड यांनी तातडीने घटनास्थळी दाखल होत जमावाला शांत केले व श्वान पथकास पाचारण करून आरोपीचा शोध घेतला यावेळी पुतळा विटंबना प्रकरणी पोलिसांनी सचिन दत्ता गायकवाड यास ताब्यात घेतले आहे. पुढील गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया पोलीस स्टेशन माळाकोळी येथे सुरू आहे. सदर विटंबना करणारा युवक मनोरुग्ण असून त्याचे पुणे येथे उपचार सुरू असल्याची चर्चा गावात सुरू होती.
यावेळी जिल्ह्यातील सर्वच राजकीय पक्ष व संघटनांच्या प्रतिनिधींनी यावेळी मालेगाव येथे भेट भेट दिली यामध्ये वंचित बहुजन आघाडीचे दक्षिण चे जिल्हाध्यक्ष शिवाभाऊ नरंगले ,आझाद समाज पार्टीचे राहुल प्रधान , वंचित बहुजन आघाडी चे उत्तर चे जिल्हाध्यक्ष प्रशांत इंगोले लोहा येथील नगरसेवक पंचशील कांबळे , बी एस पी चे जिल्हाध्यक्ष मनिष कावळे, जिल्हा संघटक बी एस ढोले ,माजी नगरसेवक बालाजी किल्लारे , बी आर एस पी चे जिल्हाध्यक्ष अरुण सोनटक्के ,माजी सरपंच वाघमारे , सरपंच प्रतिनिधी बालाजी राठोड विजय कुमार वाघमारे यांच्यासह राजकीय पदाधिकारी व कार्यकर्ते उपस्थित होते.प्रमुख सर्वच राजकीय पदाधिकाऱ्यांनी संबंधित आरोपीला अटक झाली असल्यामुळे जमावाने शांतता प्रस्थापित करून सहकार्य करण्याचे आवाहन केले.
यावेळी वंचित बहुजन आघाडीच्या वतीने प्रशासनाला निवेदन देऊन तातडीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा पूर्णाकृती पुतळा बसवणे , पुतळा परिसरात सीसीटीव्ही बसवणे , 24 तास सुरक्षा पुरवणे संदर्भात मागण्या करण्यात आल्या आहेत. यावेळी आरोपीस अटक केल्यानंतर राजकीय पदाधिकारी व प्रशासनाच्या वतीने उपस्थित जमावाला शांततेचे आवाहन करण्यात आले.पुढील तपास उपविभागीय पोलिस अधिकारी श्री कांबळे यांच्या नेतृत्वात सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री घाटे व कर्मचारी करत आहेत. विविध संघटनेच्या वतीने निषेध महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णाकृती पुतळ्याची माळेगाव येथे झालेली विटंबना ही घटना अतिशय निंदनीय असून , सदर घटना सामाजिक एकोप्याला तडा देणारी घटना आहे , यापूर्वी तालुक्यात अशी घटना कधीही घडलेली नाही, सदर प्रकरण अतिशय संयमाने प्रशासनाने हाताळलेले आहे, यापुढेही प्रशासनाने कठोर कारवाई करून आरोपीला शिक्षा केली पाहिजे अशा भावना विविध सामाजिक संघटनांनी व राजकीय पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केल्या आहेत, भाजपाचे तालुकाध्यक्ष शरद पवार शिवसेनेचे विधानसभेचे नेते बाळासाहेब कराळे काँग्रेसचे तालुकाध्यक्ष रामनाथ भुजबळ राष्ट्रवादीचे तालुकाध्यक्ष संजय कराळे माजी उपनगराध्यक्ष छत्रपती धुतमल , शेषराव मुकदम , गटनेते करीम शेख , केशवराव मुकदम, मिलिंद पवार बालाजी जाधव, अनिल जाधव , केतन खिल्लारे प्रमोद धुतमल ,भारत महाबळे यांच्यासह विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांनी निषेध व्यक्त केला आहे .
खासदार चिखलीकर यांच्याकडूनही निषेध ;
याप्रकरणी खासदार प्रतापराव पाटील चिखलीकर यांनीही निषेध व्यक्त केला आहे माळेगाव येथील घटना अतिशय निंदनीय असून तालुक्यात अशी घटना यापूर्वी घडली नव्हती, प्रशासनाने आरोपीविरुद्ध योग्य कार्यवाही करावी ,महामानव डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना मी अभिवादन करतो अशा शब्दात खा.चिखलीकर यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या.